पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ वें. ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३४७ स्थापन करण्यांत आली होती. यानंतर अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण पॅसिफिक महासागरांत स्थापन केलेल्या बटेव्हिया या मुख्य वसाहतीचा हा एक भाग ब्रिटिश वसाहत. आहे असें समजण्यांत येई. १७९५ मध्यें नेपो- लियननें हॉलंडचें राज्य काबीज केल्यावर तेथील राजास इंग्लंडमध्यें पळ काढावा लागला. हॉलंडच्या राजाच्या विनंतीवरून ' केप कॉलनी ' या वसाहतीवर इंग्लिशांनीं आपलें वर्चस्व बसविलें; सरतेशेवटीं १८१४ मध्यें नेपोलियनचा पराभव झाल्यावर इंग्लिशांनीं डच सरकाराकडून ९ कोटी रुपयांस ती वसाहत विकत घेतल्यानें ती पूर्णपणे इंग्लंडच्या ताब्यांत आली. या वसाहतींत स्थायिक झालेले डच (बोअर) रहिवाशी व नवीन वसाहत करणारे ब्रिटिश लोक यांमध्यें कलह होऊं लागले; व तद्देशीय मूळचे काफिर, हाटेंटॉट रहिवाशी व गुलामगिरी यासंबंधी इंग्लंडकडून वसाहतवाल्यांवर कडक निर्बंध घालण्यांत आल्यामुळे १८३६-१८४० च्या दरम्यान डच बोअर लोकांनीं दक्षिण आफ्रिकेंतील मूळची केप- कॉलनी ही वसाहत सोडून उत्तरेच्या बाजूस 'ऑरेंज फ्री स्टेट' व 'ट्रान्स- वॉल' या दोन वसाहती स्थापन केल्या. मध्यंतरीं १८२४ मध्यें कांहीं इंग्लिश लोकांनीं 'नाटाल' नांवाची एक वसाहत स्थापन केली होती. १८७२ मध्ये ' केप कॉलनी' या वसाहतींत व १८९३ मध्ये 'नाटाल' या वसाहतींत जबाबदार राज्यपद्धति स्थापण्यांत आली. इंग्लंडने १९०२ मध्ये 'ट्रान्सवॉल', व 'ऑरेंज फ्री स्टेट' या डच वसाहती जिंकून घेतल्या- वर त्यांनाही १९०६ व १९०७ मध्ये अनुक्रमें जबाबदार राज्यपद्धतीचे अधिकार देण्यांत आले. सरतेशेवटीं दक्षिण आफ्रिकेतील या चार ब्रिटिश वर्चस्वाखालीं असलेल्या वसाहतींचं एकीकरण करावें असें वाटून १९०९ मध्ये पास झालेल्या ब्रिटिश पार्लमेंटच्या कायद्यान्वयें या कल्प- नेस मूर्त स्वरूप देण्यांत आलें !