पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण ब्रिटिश साम्राज्यांतील चवथी वसाहत म्हणजे 'न्यू झीलंड' ही होय ! १७७९ मध्यें कूक नांवाच्या प्रवाशानें या वसाहतीचा शोध लावला. पण १८१४ पर्यंत तेथें जाऊन वसाहत करण्याचें कोणीं मनांत आणलें नाहीं, परंतु त्यानंतर तेथील मूळच्या मेओरि रहिवाशांस ख्रिश्चन धर्माची दीक्षा द्यावी या हेतूनें कांहीं धर्माधिकारी तिकडे जाऊं लागले ! न्यू झीलंडमध्ये जाऊन तेथें शास्त्रीय पद्धतीनें वसाहती स्थापन करण्याची आपणास परवानगी मिळावी म्हणून वेकफिल्ड नांवा- च्या गृहस्थानें बरीच खटपट केली, परंतु त्यास या कामी यश आलें नाहीं. १८४० मध्यें हडसन नांवाच्या गृहस्थानें पहिल्याप्रथम ब्रिटिश निशाण तेथें रॉवलें; व तेथील बराच मुलूख ब्रिटिश वर्चस्वाखालीं आणला. यानंतर वॅटॅगी येथें तेथील मूळच्या मेओरि लोकांशी तह होऊन तेथील ब्रिटिश वर्चस्वास कायदेशीर स्वरूप प्राप्त झालें. हलके हलके तेथील ब्रिटिश वसाहतीची उत्क्रांति होऊन १८५२ मध्ये त्यास जबाबदार राज्यपद्धतीचे अधिकार देण्यांत आले. न्यू झीलंड वसाहत. कॅनडा, आस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका वगैरे ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतींप्रमाणे आशियाखंडांतील हिंदुस्थान हा विस्तृत प्रदेश ब्रिटिश साम्राज्यांत मोडतो. सन १८५८ मध्ये हिंदुस्थानसंबंधी सर्व व्यवस्था ब्रिटिश पार्लमेंटनें आपल्या हातीं घेतली. त्यावेळी इंग्लंडच्या गादीवर असलेल्या व्हिक्टोरिया महाराणीनें एक जाहीरनामा प्रसिद्ध करून हिंदी लोकांस गोऱ्या लोकांच्या बरोबरीनें वागवून त्यांना हिंदुस्थानचा प्रश्न. कोणतीही हुद्याची जागा खुली असल्याचें, व हिंदुस्थानचा राज्यकारभार हिंदी लोकांच्या हिताच्या दृष्टीने चालविण्याचें अभिवचन दिलें. १८५८ सालचा राणीचा जाहीरनामा म्हणजे हिंदी जनतेच्या सनदशीर चळवळीचा मॅग्ना चार्टाच आहे ! १८५८ सालचा जाहीरनामा प्रसिद्ध होऊन बरींच वर्षे झालीं तरी त्या जाहीरनाम्याप्रमाणें