पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण लोकांसही तेथें जाऊन वसाहत करण्याची परवानगी देण्यांत आली. १७८७ पासून १८४२ पर्यंत तेथील सर्व कारभार गव्हर्नरच्याच तंत्रानें चाले, परंतु १८४२ मध्ये गव्हर्नरला मदत करण्यासाठीं एक सल्लागार मंडळ देण्यांत आलें. बॉटनी आखातानजीक स्थापन झालेल्या या वसाहतीस न्यूसाउथ वेल्सची वसाहत म्हणत. हलके हलके या वसाहतीची भरभराट होऊन व्हिक्टोरिया, क्वीन्सलँड, टास्मानिया, या नवीन वसाहती, आस्ट्रेलियाच्या विस्तृत प्रदेशांत स्थापन करण्यांत आल्या. १८५० ते १८५९ पर्यंत या सर्व वसाहतींस जबाबदार राज्यपद्धतीचे अधिकार देण्यांत आले. सरतेशेवटीं आस्ट्रेलिया या विस्तृत प्रदेशांतील सर्व ब्रिटिश वसाहतींचा एक संघ स्थापन करावा असें तेथील लोकांस वाटू लागलें; व एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं जर्मनी, फ्रान्स वगैरे राष्ट्रांचाही दक्षिण पॅसफिक महासागरांतील प्रदेशावर डोळा आहे, हैं. लक्षांत येतांच सर्व ब्रिटिश वसाहतींच्या संरक्षणाच्या दृष्टीनें एक संघ असलेला चांगला असें वाटून त्या कल्पनेस मूर्त स्वरूप देण्यासाठी सर्व वसाहतींमधील प्रतिनिधींची एक बैठक सिडने येथें भरली. या बैठकीं आस्ट्रेलियांतील ब्रिटिश वसाहतींचा संघ स्थापन करण्याचें ठरून त्याप्रमाणें ब्रिटिश पार्लमेंटला विनंति करण्यांत आली. अशारीतीनें ब्रिटिश पार्लमेंटनें १९०० मध्ये तेथील लोकांच्या सूचनेवरून एक कायदा पास करून आस्ट्रे लियांतील संयुक्त वसाहतींच्या संघास मान्यता दिली ! ब्रिटिश साम्राज्यांत मोडणारी तिसरी मोठी वसाहत म्हणजे दक्षिण आफ्रिकेची होय. यापैकी ' केपकॉलनी ' ही मुळची वसाहत १६५२ मध्यें डच ईस्ट इंडिया कंपनीनें स्थापन केली. आपल्या पूर्वेकडील प्रदेशा- कडे जाणान्या व्यापारी जहाजांस खाण्यापिण्याचे जिन्नस पुरवण्यासाठी एखादें अर्ध्या वाटेवर ठिकाण असावें या हेतूनें ही वसाहत पहिल्या