पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ वें. ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३४५ पडूं लागले; तेव्हां वरील प्रकार कमी व्हावेत या हेतूनें १८६७ मध्यें 'ब्रिटिश उत्तर अमेरिकेचा कायदा' ब्रिटिश पार्लमेंटकडून पास करण्यांत येऊन अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींचा एक संघ स्थापन करण्यांत आला; य अँटरियो, क्केबेक, नोव्हास्कोशिया, न्यू बन्सविक असे चार विभाग पाडण्यांत आले. त्यानंतर मॅनिटोबा, व्हेंकूव्हार, ब्रिटिश कोलंबिया, प्रिन्स एडवर्डबेट, अलबर्टास वगैरे उत्तर अमेरिकेंतील नवीन वसाहतीही या संघांत सामील करण्यांत आल्या. कॅनडामध्यें जबाबदार राज्यपद्धतीची स्थापना झाल्यावर, इतर वसाहतींमध्येही तशाच प्रकारची राज्यपद्धति अमलांत आणण्याचें धोरण इंग्लडनें स्वीकारून १८५५ मध्ये उत्तर अमेरिकेलगतच्या न्यूफाउंडलंड या वसाहतींत ' जबाबदार राज्यपद्धती'ची स्थापना करण्यांत आली. यानंतर दक्षिण पॅसिफिक महासागरांतील आस्ट्रेलिया या प्रदेशांतील वसाहतींना १८५० च्या सुमारास जबाबदार राज्यपद्धतीचे अधिकार देण्यांत येऊन इ. स. १९०० मध्ये या सर्व वसाहतींचें एक संयुक्त राष्ट्र स्थापन करण्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटकडून पास करण्यांत आला. आस्ट्रेलिया प्रदेशाचा १७६९ मध्यें थॉमस कुक नांवाच्या धाडशी गृह- स्थानें पहिल्या प्रथम शोध लावला होता. परंतु बरींच वर्षे तिकडे जाऊन वसा- हत स्थापन करावी असें कोणाच्याही मनांत आलें नाहीं. परंतु १७८३ मध्यें उत्तर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींनीं आपलें स्वातंत्र्य प्रस्थापित केल्या- वरं तिकडे इंग्लंडमधील गुन्हेगार कैदी पाठविण्याचा प्रघात अर्थातच बंद झाला. तेव्हां कैदी पाठविण्यासाठी दुसरी एखादी सोयीस्कर जागा पहाणें अवश्य होतें. सरतेशेवटीं आस्ट्रेलिया प्रदेशाकडे या कैद्यांची रवानगी करावी असें वाटून १७८७ मध्ये पहिल्याप्रथम गुन्हेगार कैदी लोकांची पहिली- वसाहत बॉटनी आखातानजीक करण्यांत आली. यापुढें ३० वर्षे फक्त गुन्हेगार लोकांसच येथें पाठविण्यांत येत असे; परंतु १८२७ मध्ये इतर आस्ट्रेलिया वसाहत. २२