पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण घेणाऱ्या बऱ्याच लोकांस स्वातंत्र्य प्रस्थापित करणाऱ्या वसाहतींकडून वाईट रीतीनें वागविण्यांत येत असल्यामुळे या वसाहतीं- कॅनडा वसाहत. तून बरेच लोक इंग्लंडच्या अंमलाखाली असलेल्या कॅनडा वसाहतीकडे लोटूं लागले. हे लोक येण्यापूर्वी कॅनडांत स्थाि झालेले लोक फ्रेंच असून रोमन कॅथलिक पंथाचे अनुयायी होते, पण हे नवीन येणारे लोक इंग्लिश असून प्रॉटेस्टंट पंथाचे अनुयायी असल्यानें थोडक्याच दिवसांत कॅनडा वसाहतींत फ्रेंच व इंग्लिश असे दोन तट पडून त्यांचे आपापसांत कलह होऊं लागले. तेव्हां या वसाहतीचे दोन विभाग केल्याखेरीज गत्यंतर नाहीं असें वाटून पीटने १७९९ मध्ये कॅन- डाच्या राज्यकारभारासंबंधीं एक कायदा पास केला, व कॅनडाचे अँटरियो व क्वेबेक असे दोन विभाग केले. अशाप्रकारें कॅनडाचे दोन विभाग करून तेथें प्रातिनिधिक स्वरूपाची राज्यपद्धति आमलांत आणली गेली, तरी या पद्धतीनें कार्यकारी मंडळ कायदे करणाऱ्या मंडळास जबाबदार नसल्यानें वरचेवर एकमेकांत खटके उडत, व १८३७ च्या सुमारास तर कार्यकारी मंडळ व कायदे करणारें मंडळ यांच्यामधील मतभेद विकोपास जाऊन सर्व कॅनडाच बंड करण्यास प्रवृत्त झाला ! तेव्हां कोणती राज्यपद्धति अमलांत आणल्यास कॅनडामधील प्रश्नाचा समाधानकारक रीतीनें निकाल लागेल या- विषयीं योग्य तो रिपोर्ट करण्यासाठी लॉर्ड डरहॅम यास कॅनडामध्यें पाठ- विण्यांत आले (१८३७). कॅनडामध्यें इंग्लंडच्या नमुन्याप्रमाणें 'जबाबदार राज्यपद्धती'चा पुरस्कार केल्याखेरीज कार्यकारी मंडळ व कायदे करणारें मंडळ यांच्यामध्यें सलोखा रहावयाचा नाहीं असें वाटून लॉर्ड डरहॅमनें त्या- प्रमाणें आपल्या रिपोर्टात सूचना केली. या रिपोर्टन्विये १८४० मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनें एक कायदा पास करून सर्व कॅनडाचे एकीकरण केलें व तेथें. 'जबाबदार राज्यपद्धती'चा पाया घातला. परंतु या नवीन कायद्यान्वयें कॅनडाचे १७९१ मध्ये केलेले दोन विभाग नाहींसे करण्यांत येऊन सर्व कॅनडाचें एकीकरण करण्यांत आल्यानें पूर्ववत् फ्रेंच व इंग्लिश असे तट