पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१. ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३४३ म्हणजे अमेरिकेतील कॅनडा, न्यू फाउंडलँड, लॅवेगार, न्यू गायना, हंडूरास, फाकलँड, बरम्यूडा वगैरे प्रदेश व बेटें हा होय. (३) तिसरा विभाग म्हणजे आस्ट्रेलेशिया खंडांतलि आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, न्यूगायना हा प्रदेश होय. (४) चवथा विभाग म्हणजे आफ्रिका खंडांतील दक्षिण आफ्रिकेंतील संयुक्त वसाहती, रोडेशिया, नॅगेरिया हा प्रदेश, व अप्रत्यक्षरीतीनें ब्रिटिश वर्चस्वाखालीं असलेला इजिप्त, सडन हा प्रदेश होय. (५) पांचवा विभाग म्हणजे आशिया खंडांतील हिंदुस्थान, सीलोन, ब्रह्मदेश, हाँगकाँग, मला- या सामुद्रधुनीलगतचा प्रदेश, बोर्नीयो, सॅरवाक वगैरे प्रदेश होय. (६) सहावा विभाग दक्षिण अमेरिकेलगतचीं जमाका, बहामाज्, बार- बोडास, ट्रिनीडाड, टोबॅगो, विंडवर्ड, लीवर्ड बगैरे बरींच बेटें हा होय. अशाप्रकारें पांचही खंडांत पसरलेल्या या विस्तृत साम्राज्यांत मोडणाऱ्या प्रदेशांस राज्यकारभाराच्या दृष्टीनें निरनिराळे हक्क देण्यांत आले आहेत. कॅनडा, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त दक्षिण आफ्रिका या ब्रिटिश वसाहतींस 'स्वयंसत्ताक जबाबदार राज्यपद्धतीचे' अधिकार देण्यांत आलेले आहेत. हिंदुस्थान, सिलोन वगैरे प्रदेशांत प्रातिनिधीक राज्यपद्धतीचा पुरस्कार करण्यांत आला असून, हिंदुस्थानास जबाबदार राज्यपद्धतीचे कांहीं अधिकार ब्रिटिश पार्लमेंटनें नुकतेच दिले आहेत. याखेरीज ब्रिटिश साम्राज्यांत मोडणाऱ्या लहानलहान बेटांमध्ये प्रातिनिधिक राज्यपद्धतही अमलांत नसून तेथील राज्यकारभार गव्हर्नरच्याच तंत्रानें चालविण्यांत येतो. अशाप्रकारें या विस्तृत ब्रिटिश साम्राज्यांतील प्रमुख वसाहतींनी जबाबदार राज्यपद्धतीचे अधिकार कसकसे संपादन करून घेतले हैं पहावयाचें आहे. इ. स. १७८३ मध्यें उत्तर अमेरिकेतील १३ ब्रिटिश वसाहतींनीं आपलें स्वातंत्र्य प्रस्थापित केल्यावर, १७६० मध्ये फ्रेंच लोकांकडून जिंकून घेतलेली कॅनडाची वसाहतच कायती इंग्लंडच्या वर्चस्वाखालीं राहिली होती. • अमेरिकेतील वसाहतींशीं नुकत्याच झालेल्या युद्धांत इंग्लंडच्या वतीने भाग