पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण न्यू झीलंड, साउथ आफ्रिका या ठिकाणीं प्रस्थापित होत असलेल्या आपल्या वसाहतींस उदारपणें 'जबाबदार राज्यपद्धती'चे अधिकार दिल्या - •मुळे आज जगाच्या पंचमांश भागावर पसरलेले बलाढ्य ब्रिटिश साम्राज्य आपणास दिसत आहे ! एकंदर बलाबल, लोकसंख्या, प्रदेशविस्तार या सर्व दृष्टीनें विचार केल्यास ब्रिटिश साम्राज्याचा दर्जा सर्वांत वरचा लागेल. जगाच्या एक- पंचमांश भूपृष्ठावर म्हणजे अजमासें सव्वा कोटी चौरस मैलांच्या क्षेत्र- फळावर हैं साम्राज्य पसरलेलें आहे. या अफाट साम्राज्याचें केंद्रस्थान जें ग्रेट ब्रिटन त्याचें क्षेत्र- फळ अजमासें १ लक्ष २० हजार चौरस मैल आहे. तेव्हां तुलनात्मकदृष्टीनें विचार केल्यास ग्रेट ब्रिटन- ब्रिटिश साम्राज्याचें श्रेष्ठत्व. "पेक्षां विस्ताराच्या मानानें हिंदुस्थान १५ पट, उत्तर अमेरिकेंतील कॅनडा ही वसाहत ३० पट, आस्ट्रिलिया व न्यू झीलंड मिळून २५ पट, दक्षिण आफ्रिकेंतील ब्रिटिश वसाहत ५ पट आहे. याखेरीज आफ्रिका खंडांतील · सडन, नॅगेरिया, इजिप्त वगैरे प्रदेशांवर ब्रिटिशांचा पूर्वीपासून थोडाफार अंमल असे, व नुकत्याच झालेल्या महायुद्धानें जर्मन पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, पॅलस्टाईन वगैरे बराच मुलूखही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीनें ब्रिटिशांच्या ताब्यांत येण्याचा संभव असल्यामुळें हें साम्राज्य अधिकच विस्तृत होईल ! लोकसंख्येच्या दृष्टीनें विचार केल्यास ब्रिटिश साम्राज्याचें श्रेष्ठत्व तात्काळ लक्षांत येतें. जगाची एकंदर लोकसंख्या अजमासें १ अब्ज ७२ कोटी आहे त्यापैकी ४३ कोटी लोक ब्रिटिश प्रजाजन आहेत ! अशाप्रकारच्या या अवाढव्य विस्तृत ब्रिटीश साम्राच्याचे भौगो- लिक दृष्टीनें आपणास मुख्यतः ६ विभाग करतां येतील ( १ ) यापैकीं १ ला विभाग म्हणजे युरोपखंडांत मोडणारा प्रदेश. यांमध्यें इंग्लंड, स्कॉटलंड, आर्यलंड हा प्रदेश असून चॅनेल, मॅन, सायप्रस, माल्टा हीं बेटें व जिब्राल्टरचा किल्ला एवढा प्रदेश येईल. ( २ ) दुसरा विभाग