पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ वें. ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३४१ इंग्लिश, स्पॅनिश व पोर्तुगिज वसाहती मातृ- भूमीविरुद्ध युद्ध जाहीर करतात. होण्यास इंग्लंडच कारणीभूत झालें होतें, तेव्हां त्यांच्यावर सूड उग- विण्यास ही संधि चांगली आहे असें वाटून फान्सनें इंग्लिश वसाहतींस मदत केली. हें युद्ध ८ वर्षे पर्यंत चालल्यानंतर १७८३ मध्ये व्हर्सेल्स येथें तह होऊन इंग्लंडला संयुक्त वसाहतींचें स्वातंत्र्य कबूल करणें भाग पडलें. अशाप्रकारें सप्तवार्षिक युद्धांत कॅनडा, केबेक वगैरे फ्रेंच लोकांकडून जिंकून घेत- लेल्या वसाहतींखेरीज खास इंग्लिश लोकांनीं स्थापलेल्या वसाहती इंग्लं- डच्या ताब्यांतून गेल्या. आपल्या हितसंबंधाकडे यत्किंचितही लक्ष न देतां मातृभूमीकडून आपणावर व्यापार व उद्योगधंदे या बाबतींत कडक निर्बंध घालण्यांत आल्यास मातृभूमीविरुद्ध युद्ध पुकारून आपलें. स्वातंत्र्य जाहीर केल्यावांचून गत्यंतरच नाहीं हें जणूं काय अमेरिकेतील इंग्लिश वसाहतींनीं सर्व जगास दाखवून दिलें ! यानंतर २५ वर्षांनींच युरोपमध्यें नेपोलियनशीं चाललेल्या युद्धाची संधि साधून दक्षिण अमे- रिकेंतील स्पॅनिश वसाहतींनीं स्पेनच्या राजास नेपोलियनने पदच्युत केल्याचें निमित्त पुढें करून आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें. यानंतर स्पेनच्या राजास पुनः जरी राज्यपद मिळालें तरी स्वातंत्र्याचा आस्वाद घेणाऱ्या स्पॅनिश वसाहतींनीं पुनरपि स्पेनच्या मगरमिठींत शिरण्याचें. साफ नाकारलें. इकडे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या पोर्तुगीज वसा- हतीनेंही स्पॅनिश वसाहतीचा कित्ता गिरवून आपलें स्वातंत्र्य जाहीर केलें !. अशा प्रकारें ( १७७५-१८२५ ) अमेरिकेतील ब्रिटिश, स्पॅनिश, पोर्तुगीज वसाहतींनीं मातृभूमीचें जूं झुगारून देऊन स्वातंत्र्य जाहीर केल्यामुळे, आज दोनशे वर्षे वसाहतीसंबंधीं मातृभूमीचें जें धोरण होतें, त्यांत फरक केला नाहीं तर योग्य संधि सांपडतांच वसाहती मातृभूमी- पासून अलग होण्याचा प्रयत्न करतील हैं स्पष्ट दिसूं लागलें ! इंग्लंडने वरील उदाहरणानें सावध होऊन उत्तर अमेरिकेतील कॅनडा तद्वतच आस्ट्रिलिया,