पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४० युरोपचा अर्वाचीन इतिहास [ प्रकरण संबंधीं धोरण बहुतेक सारखेच असें. वसाहतीवर आपणास पाहिजे तशी युरोपियन राष्ट्रांचें वसाहतीसंबंधी धोरण व त्याचे परिणाम. १५००-१८२५. राज्यपद्धति लादावयाची, त्यांच्यावर डोईजड कर बसावयाचे, व्यापार व उद्योगधंदे या बाब तींत त्यांच्या मार्गांत वाटेल त्या अडचणी आणून त्यांच्या हितसंबंधाकडे यत्किंचितही लक्ष न देतां या वसाहतीपासून युरोपमधील आपल्या राष्ट्रांचा होईल तितका फायदा करून घ्यावयाचा अशाच प्रकारचें तें धोरण असे ! पहिल्याप्रथम स्पेननें या धोरणाचा अंगीकार केला. अमेरिकेतील आपल्या वसाहतींतून सोनें व रूपें युरोपमध्यें आणावें व तेथील लोकांस व्यापार करावयाचा असल्यास त्यांनीं फक्त स्पेनशींच व स्पेनने ठरविलेल्या भावा- नेंच करावा असें स्पेनचें धोरण असे. इतर राष्ट्रांनीही स्पेनप्रमाणेच आपलें धोरण आंखलें होतें. यावेळीं युरोपचा बहुतेक व्यापार डच लोकांच्या हातीं होता, तेव्हां डच लोकांचा वृद्धिंगत होत चाललेला व्यापार आपल्या हातीं आणावा, इंग्लिश लोकांस जहाजें बांधण्यास उत्ते- जन मिळावें व इंग्लंडचें आरमार बलाढ्य करावें या हेतूंनीं प्रेरित होऊन क्रॉमवेलनें १६५१ मध्यें नॅव्हिगेशन कायदा केला. या कायद्यामुळे इंग्लंड- चा युरोपमधील दर्जा वाढून डच लोकांचा सर्व व्यापार इंग्लिशांना आपल्या हातीं आणतां आला, तरी या कायद्यामध्यें इंग्लिश वसाहतींच्या हितसंबंधाकडे अगदींच दुर्लक्ष केलें असल्यानें वसाहतींचें अपरिमित नुकसानच झालें असें म्हणावयास पाहिजे. आज १२५ वर्षे या ' नॅव्हिगे- शन कायद्या'च्या मगरमिठींत असल्यानें चिडून जाऊन अमेरिकेतील १३ इंग्लिश वसाहतींनी ब्रिटिश पार्लमेंटनें आपल्या संमतीखेरीज आपणावर जाचक कर लादले असें निमित्त कारण पुढे करून १७७५ मध्ये इंग्लंड- विरुद्ध युद्ध जाहीर केलें. आपली उत्तर अमेरिकेतील सत्ता समूळ नष्ट