पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ वें. ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३३९ वसाहतींमध्येही झटापटी सुरू होऊन फ्रेंचांच्या बहुतेक सर्व वसाहती इंग्लिशांच्या ताब्यांत आल्या, व १७६३ मध्ये झालेल्या तहानें या सर्व वसाहतींवर इंग्लिशांचें वर्चस्व प्रस्थापित झाल्यानें फ्रेंचांची उत्तर अमेरिकेंतील सत्ता संपुष्टांत आली ! दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश व पोर्तुगीज वसाहती, उत्तर अमेरिकें- तील इंग्लिश व फ्रेंच वसाहती, हिंदुस्थानांतील इंग्लिशांचा व्यापार व साम्राज्य, दक्षिण पासिफिक महासगरांतील जाव्हा, सुमात्रा, अंबोयना वगैरे बेटांकडील डच लोकांचा व्यापार व वसाहती यांची भरभराट होत असतां, मध्य अमेरिकेत लगतच्या लीवर्ड, विंडवर्ड, अँटीलीज वगैरे द्वीप- समूहांतील नानाविध बेटांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करून तेथील जमि- नींची लागवड करण्याचे युरोपमधील बहुतेक सर्व राष्ट्रांचे प्रयत्न सुरू होते. या बेटांत उष्णकटि- बंधांतील पिकेंही येत असल्यामुळे त्यांस फारच 'वेस्ट इंडिज' बेठें व गुलामगिरी. महत्त्व आलें होतें. ह्या बेटांतील जमिनी लागवडीस आणण्यासाठी आफ्रिकें- तील निग्रो लोकांस गुलाम पकडून आणीत. हे गुलाम पुरविण्याचा पोर्तुगीज लोकांनी जणूं काय मक्ताच घेतला होता ! या निग्रो गुलामांस या बेटांवरील मळेवाले इतके क्रूरपणें वागवीत कीं दरवर्षी जवळ जवळ गुलाम मृत्युमुखी पडत ! ही गुलामगिरीची अमानुष पद्धत बंद करण्याच्या कामीं पहिल्याप्रथम डेन्स लोकांनी पुढाकार घेतला व त्यानंतर इंग्लंड, फ्रान्स, युनायटेड स्टेटस् वगैरें राष्ट्रांनी प्रयत्न केल्यामुळे गुलामगिरीची पद्धत जगांतून कायमचीच बंद करण्यांत आली. कोलंबस व वास्को-डी-गामा यांनीं अमेरिका व हिंदुस्थान या देशांचा शोध लावल्यानंतर युरोपियन राष्ट्रांनी युरोपच्या बाहेर वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केल्याला अठराव्या शतकाच्या शेवटीं ३०० वर्षे झालीं होतीं, या अवधीत युरोपियन राष्ट्रांचें आपापल्या वसाहती -