पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण: वसाहत स्थापन केली. १६१७ मध्यें चंगलेनच्या सरोवराचा शोध लागल्या- वर, या सरोवरांतून आपलें जहाज पुढें हांका- उत्तर अमेरिकेतील फ्रेंच वसाहती. रल्यास कदाचित् चीन देशाचा शोध लागेल अशा समजुतीनें त्यानें आपलें जहाज अँटरियो सरो-- वराच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत नेलें. १६२७ मध्ये फ्रान्समधील प्रख्यात मुत्सद्दी रिशल्यू याच्या प्रेरणेनें 'न्यू फ्रान्स' नांवाची कंपनी स्थापन होऊन १५ वर्षे पर्यंत सेंट लॉरेन्स आखातानजीकच्या प्रदेशांत व्यापार करण्याची या कंपनीस परवानगी देण्यांत आली. परंतु या कंपनीकडून विशेष अशी कोणतीच कामगिरी न झाल्यामुळे १६७४ मध्ये या कंपनीचें विसर्जन होऊन उत्तर अमेरिकेतील सर्व वसाहती सरकारने आपल्या ताब्यांत घेऊन तेथें राज्यकारभार करण्यास गव्हर्नर पाठविण्यास सुरवात केली. यानंतर सुपीरियर सरोवर व मिसीसिपी नदीचा उगम यांचा शोध लागून १६८२ मध्यें सॅले नांवाच्या गृहस्थानें तर आपलें जहाज मिसीसिपी नदीच्या उग-- मापासून तो थेट मेक्सिकोच्या आखातांत नेलें; व तेथें लुइस्बर्ग नांवाची वसाहत स्थापन केली. अशाप्रकारें उत्तरेस केबेकची वसाहत व दक्षिणेस लुईस्बर्गची वसाहत व या दोन वसाहतीस जोडण्यासाठीं पश्चिमेच्या बाजूस निरनिराळीं ठाणीं फ्रेंच लोकांनीं स्थापन केल्यामुळे, अलगिनीज पर्वत व अटलांटिक महासागर यांमधील चिंचोळ्या प्रदेशांत इंग्लिश वसाहतींना त्यांनी घेरून टाकल्यासारखेंच झालें ! अशा प्रकारें अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच उत्तर अमेरिकें-- तील वर्चस्वासंबंधानें इंग्लिश व फ्रेंच यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली ! १७१३ मध्यें झालेल्या युट्रेक्टच्या तहानें आकाडिया (नोव्हा स्कोशिया), गार्गिया, हडसन आखातनजीकचा मुलूख इंग्लिशांच्या ताब्यांत आला. या- पुढील ४५ वर्षे इंग्लिश व फ्रेंच यांच्यामधील संबंध जरी सलोख्याचे नसले तरी युद्धप्रसंग झाले नाहींत. परंमु १७५६ मध्ये युरोपमध्यें उपस्थित झालेल्या ‘सप्तवार्षिक युद्धा'च्या वेळीं उत्तर अमेरिकेतील फ्रेंच व इंग्लिश