पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ वें. ] युरोपियन राष्ट्राच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३३७ मध्यें स्पेनच्या आरमाराचा नाश झाल्यावर स्पेनची आरमारी सत्ता संपुष्टांत आली; व वसाहती स्थापन करण्याचे जोरानें प्रयत्न करण्यांत येऊ लागले. १६०६ मध्ये पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीत व्हर्जिनिया कंपनीस उत्तर अमेरिकेंत अटलांटिक महासागरालगतच्या प्रदेशावर वसाहत स्थापन करण्यासाठीं पहिल्याप्रथम सनद देण्यांत आली. यानंतर पुढील १००-१२५ वर्षांमध्यें एकीकडे अलगिनीज् पर्वत व एकीकडे अटलांटिक महासागर यांमधील चिंचोळ्या प्रदेशांत इंग्लिशांनी मूळच्या व्हर्जीनिया वसाहतीखेरीज मॅसाच्यूसेट्, मेरीलँड, न्यूहॅपशायर, दक्षिण कार्नेलिया, उत्तर कार्नेलिया, न्यूयार्क, डेलावर, पेनसल्व्हानिया, गार्गिया, रोडबेटें या एकंदर १३ वसाहती स्थापन केल्या. या वसाहती स्थापन करतांना त्यांना डच लोकांशीं युद्धप्रसंग करण्याचे प्रसंग पहिल्याप्रथम बरेच आले; परंतु १६६४ च्या सुमारास युरोपखंडांतच फ्रेंच राष्ट्राच्या तावडींतून आपल्या देशाचें संरक्षण करण्यामध्यें डच लोकांची सर्व शक्ति खर्च झाल्यामुळे, उत्तर अमेरिकेंतील आपल्या वसाहतीकडे त्यांना लक्ष पुरवितां आलें नाहीं. अशा- रीतीनें डच लोकांची उत्तर अमेरिकेतील सर्व सत्ता जरी संपुष्टांत आली तरी तेथें फ्रेंच लोकांच्या वृद्धिंगत होत चाललेल्या वसाहतीकडे इंग्लिश लोकांस डोळ्यांत तेल घालून पहावें लागे ! पंधराव्या शतकाच्या शेवटीं उत्तर अमेरिकेचा शोध लागल्यावर, मच्छिमार धंद्यांत आपली बरकत करून द्यावी व जमल्यास आपल्या वसा- हती स्थापन कराव्यात असें फ्रेंच लोकांसही वाटूं लागलें होतें. १५३४ • मध्ये कार्टियर नांवाच्या फ्रेंच गृहस्थानें उत्तर अमेरिकेकडे सफर करून सेंट लॉरेन्स आखातांतून आपलें जहाज पुढें नेलें होतें. यानंतर बरींच वर्षे तिकडे वसाहती स्थापन करण्याचे फ्रेंच लोकांकडून प्रयत्न करण्यांत आले नाहींत. १६७३ मध्ये सॅम्युएल चॅम्पलेन नांवाच्या गृहस्थानें केबेकची