पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण लढाईत फ्रेंचांचा पूर्ण मोड झाल्यानें त्यांचा एक प्रतिस्पर्धी कमी झाला, व १७६१ मध्ये दक्षिणेंत कर्नाटक, म्हैसूर पासून उत्तर हिंदुस्थानांत गुज- राथ, नागपूर, बंगाल, माळवा, पंजाब व अटकेपर्यंत मराठेशाहीच्या वृद्धिंगत होत चाललेल्या सत्तेस पानपतच्या लढाईत जबरदस्त धक्का बसल्यानें हिंदुस्थानांतील मध्यवर्ती सत्ताच जणूं नष्ट झाल्यासारखें झालें ! १७९९ मध्यें म्हैसूरचा सुलतान टिपु याचा पराभव होऊन तें राज्य इंग्लिशांनीं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीनें आपल्या वर्चस्वाखालीं आणले; व एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं मराठेशाहींतील प्रमुख मुत्सद्दी महादजी शिंदे व नाना फडणवीस हे एकामागून एक मरण पावल्यानें मराठे, शाहींतील लष्करी सत्ता व शहाणपणच जणूं नष्ट झाल्यासारखें होऊन १८०३,१८०५-०६ व १८१८ मध्ये मराठेशाहींतील शिंदे, होळकर, भोंसले, पेशवे वगैरे सरदारांचा पराभव करून ईस्ट इंडिया कंपनीस हिंदुस्थानांत आपले वर्चस्व प्रस्थापित करतां आलें ! यानंतर कंपनी सरकारच्या कांहीं कृत्यानें चिडून जाऊन १८५७ मध्ये हिंदुस्थानांत बंड उपस्थित झालें, व या बंडाचा बीमोड केल्यावर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिनें हिंदुस्थानाचें राज्य कंपनी सरकारकडून आपल्या व ब्रिटिश पार्लमेंटच्या वर्चस्वाखालीं आणलें, व १८५८ मध्यें एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा राणीचा जाहीरनामा म्हणजे हिंदी लोकांच्या सनदशीर चळवळीचा मॅनाचाच होय ! १४९७ मध्ये कॅबेटनें उत्तर अमेरिकेचा शोध लावल्यानंतर बरींच वर्षे त्या ठिकाणीं जाऊन वसाहती स्थापन करण्याचे इंग्लिशांकडून प्रयत्न झाले नाहींत. यावेळीं स्पेन व पोर्तुगाल यांची आरमारी सत्ता प्रबळ असल्यानें त्यांच्याकडून या कामीं बरेच अडथळे येत ! परंतु हलके हलके इलिझाबेदच्या उत्तर अमेरिकेतील इंग्लिश वसाहतींची स्थापना. कारकीर्दीत स्पेनच्या आरमारी सत्तेस न जुमानतां तिकडे वसाहती स्थापन करण्याचे प्रयत्न करण्यांत येऊं लागले. सर हंपरे गिलबर्ट ( १५७८ ) व सर वॉल्टर राले (१५८५ ) यांनीं उत्तर अमेरिकेत वसाहती स्थापन करण्याचे प्रयत्न केले, परंतु ते सर्व निष्फळ ठरले. १५८८