पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ वें. ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३३५ लागली होती. १६६४ मध्ये १४व्या लुईच्या कारकीर्दीत फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची पहिल्याप्रथम स्थापना करण्यांत आली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचें धोरण केवळ हिंदुस्थानांत फ्रेंच लोकांचा शिरकाव. व्यापारीच नव्हतें; जमल्यास पूर्वेकडे फ्रेंच साम्राज्य प्रस्थापित करावें, अशी फ्रेंच मुत्सयांची पहिल्यापासूनच कल्पना होती ! हिंदुस्थानांत पाँडेचरी, माही, चंद्रनगर या ठिकाणी त्यांनी पहिल्याप्रथम वखारी स्थापन केल्या; व औरंगजेबच्या मृत्यूनंतर मोंगल साम्राज्यांत सर्वत्र बेबंदशाही माजल्यावर तर त्यांना चांगलेच फावलें. विस्कळित झालेल्या मोंगल साम्राज्यांतील सुभेदार व नवाब यांच्या आपापसांतील कलहांत भाग घेऊन स्वतःचें महत्त्व वाढविण्याचा फ्रेंचांनीच पहिल्याप्रथम उप- क्रम सुरू केला. अठराव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास कर्नाटकांतील नबाब व सुभेदार यांमध्यें सुरू झालेल्या कलहाचा फायदा घेऊन फ्रेंचांनी आपलें बरेंच प्रस्थ माजविलें होतें. हिंदुस्थानांत फ्रेंच साम्राज्य स्थापन करावें अशी डुप्ली याची महत्त्वाकांक्षा होती; परंतु हिंदुस्थानांतील फ्रेंच गव्हर्नर व फ्रान्समधील कंपनीचे डायरेक्टर यांच्यामध्यें कांहीं बाबतींत मतभेद होऊन डुप्लीला परत जावें लागल्यानें फ्रेंच लोकांच्या हिंदुस्थानांत साम्राज्य स्थापन करण्याच्या प्रयत्नास मूर्त स्वरूप देण्याचें काम मागें पडलें, व १७३० मध्यें वांदिवाशच्या लढाईत इंग्लिशांनी फ्रेंचांचा पूर्ण पराभव केल्यामुळे तर फ्रेंचांची हिंदुस्थानांतील सत्ता पार संपुष्टांत आली ! फ्रेंच लोकांप्रमाणें इंग्लिश लोकांसही हिंदुस्थानांत साम्राज्य स्थापन करण्याची सुखस्वमें पडूं लागलीं होतीं; व हिंदी सुभेदार व नबाब यांच्या आपापसांतील कलहांत हात घालून आपली महत्त्वाकांक्षा सफल करण्याचे त्यांचे प्रयत्य सुरू होते. १७५७ मध्यें प्लासीची लढाई जिंकल्यानें बंगालचा विस्तृत व हिंदुस्थानचें राज्य इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताव्यांत जातें. सुपीक मुलूख इंग्लिशांच्या ताब्यांत आला, १७६० मध्यें वांदिवाशच्या