पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण व मुलूख डच लोकांच्या ताब्यांत येऊन त्या सर्वांस बटेव्हियाची वसाहत असें समजण्यांत येऊं लागलें. इंग्लिश ईस्ट इंडिया व्यापार. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची १६०० मध्ये स्थापना झाल्यावर पूर्वे - कडील राष्ट्रांशीं त्यांचें दळणवळण सुरू झालें. हिंदुस्थानच्या किनाऱ्या- वर सुरत, कलकत्ता, मद्रास वगैरे ठिकाणीं आपल्या वखारी स्थापन केल्या- वर जाव्हा, सुमात्रा बेटानजीकही डच लोकांप्रमाणें व्यापार करावा असें इंग्लिश कंपनीस वाटत होतें. परंतु दक्षिण पॅसिफिकमध्यें इंग्लिशांचा हात शिरलेला डच लोकांस पाहवला नाहीं. १६२३ मध्ये कांहीं कारणांवरून अंबोनिया बेटांत डच लोकांनीं इंग्लिश लोकांची कत्तल केल्यामुळे तर इंग्लिश व डच यांच्यामध्यें कंपनीचा पूर्वेकडील वैमनस्य सुरू झालें. इंग्लिशांनीं जाव्हा, सुमात्रा वगैरे बेटांकडील व्यापारांतून आपलें अंग काढून घेऊन हिंदुस्थानच्या व्यापाराकडेच लक्ष घातलें. यावेळीं त्यांचें धोरण फक्त 'व्यापारीच असे. हिंदुस्थानांत आपणास राज्य स्थापन करतां येईल अशी त्यांची मुळींच कल्पना नव्हती ! परंतु १६८६ पासून १७०७ पर्यंत दक्षिणेंत मराठ्यांच्या वृद्धिंगत होत चाललेल्या सत्तेस थोपवून धरण्याचे कामी आपली सर्व शक्ति खर्च करावी लागल्यामुळे मोंगल साम्राज्य विस्खळित होऊं लागलें; व १७०७ मध्ये औरंगजेब बादशहा मरण पाव- ल्यानंतर तर कांहीं वर्षे मोंगल साम्राज्यांत अराजकताच माजली ! ठिक- ठिकाणचे सुभेदार, नबाब, सरदार स्वतंत्र होऊन त्यांच्या आपापसांत झटापटी सुरू झाल्या. अशाप्रकारें हिंदुस्थानांतील मध्यवर्ती सत्ता नष्ट झाल्यानें आपल्या वखारींचें संरक्षण करण्यासाठी इंग्लिशांना आपल्या वखारी सभोवताली तटबंदी करणें, त्यांच्या रक्षणार्थ थोडीबहुत फौज़ ठेवणें, सभोवतालचा कांहीं मुलूख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीनें आपल्या ताब्यांत आणणे वगैरे गोष्टी कराव्या लागल्या. इंग्लिश कंपनीचा हिंदुस्थानांत अशा रीतीनें जम बसत चालला असतां, त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून फ्रेंचांची सत्ता हिंदुस्थानांत विस्तार पा