पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्पेनची आरमारी सत्ता संपुष्टांत येते. ३३३ २१ वें . ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. देण्यासाठीं स्पेनविरुद्ध बंड पुकारलें होतें. नेदर्लंडमधील डच लोकांचा स्वार्थत्याग, त्यांची चिकाटी व त्यांस इंग्लंडनें केलेली मदत यांमुळें तें बंड मोडून टाकण्याचें कामीं फिलीपला यश आलें नाहीं. तेव्हां फिलीपनें चिडून जाऊन इंग्लंडची खोड मोडण्यासाठी १५८८ मध्ये आपल्या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या आरमाराच्या साहाय्यानें इंग्लंडवर हल्ला केला, परंतु त्याचा हा प्रयत्न सपशेल फसून त्याच्या आरमाराचा वादळानें व इंग्लिश लोकांच्या चिकाटीनें पूर्णपणें नाश झाला, व त्याबरोबर स्पेनची आरमारी सत्ताही नाहींशी झाली ! स्पेनबरोबर बिचाऱ्या पोर्तुगालचें वैभवही संपु- ष्टांत येऊन त्याचा व्यापार डच व इंग्लिश लोकांनीं बळकाविला. पूर्वे - कडील राष्ट्रांशीं व्यापार करण्यासाठी १६०० मध्ये इंग्लंडनें व १६०२ मध्यें डच लोकांनी आपापल्या कंपन्या स्थापन केल्या. डच लोकांनीं पोर्तुगीज लोकांप्रमाणें चीन, जपान वगैरे दूरदूरच्या राष्ट्रांशीं व्यापार सुरू केला होता, तरी त्यांच्या व्यापाराचा सर्व भर दक्षिण पॅसिफिक महासागरांतील मोलोको सामुद्रधुनीनजीकच्या मसा- ल्याच्या बेटांवरच असे. हिंदुस्थानच्या व्यापारा- डच लोकांचा पूर्वे - कडे त्यांनी फारसें लक्ष दिलें नाहीं. १६०७ मध्यें कडील व्यापार व त्यांनीं अंबोयना व बांडा हीं बेटें काबीज केली; वसाहती. १६१८ मध्यें जाव्हा बेट जिंकून तेथें बटेव्हिया हें गांव बसविलें व त्यास आपल्या पूर्वेकडील बेटांचें केंद्रस्थान केलें. दक्षिण पॅसिफिक महासागरांतील बेटांवर त्यांची सत्ता वाढत चालली, व १६२३ मध्ये त्यांनीं अंबोनिया बेटांतून इंग्लिशांस पाय काढावयास लावला. यानंतर, मलाका ( १६४० ), सिलोन (१६५८) या बेटांतून त्यांनी पोर्तुगीज लोकांस हांकून लावलें. १६५० मध्यें आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनीं एक वसाहत स्थापन केली. अशा प्रकारें पूर्वे - कडे दक्षिण आफ्रिका, सिलोन, अंबोनिया, टेर्नट, मलाका वगैरे बेटें