पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण: ठिकठिकाणीं जाऊन व्यापार करावा हेंच त्यांचें मुख्यतः धोरण असे, व या धोरणामुळे त्यांना आफ्रिका, हिंदुस्थान, तों थेट चीन व जपान या दूरदूरच्या देशांशीं व्यापार करतां येणें शक्य झालें. १६ व्या शतकांतील युरोपचा बहुतेक सर्व व्यापार त्यांच्याच ताब्यांत असे. चीन व जपान येथून रेशीम, मॅलाको येथून मिरे, दालचिनी वगैरे मसाल्याचें सामान, हिंदु- स्थानांतून हिरे, व इतर कलाकौशल्याचे जिन्नस पोर्तुगीज लोक युरोपला पुरवीत; व आफिकाखंडांतून गुलाम पकडून दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतीकडे त्यांची रवानगी करण्याचा पोर्तुगीज लोकांस जणूं काय मक्ताच होता ! १५१९ पासून १५४१ पर्यंत स्पेननें दक्षिण व मध्य अमेरिका येथील बराच मुलूख आपल्या वर्चस्वाखालीं आणला होता. या प्रदेशांत आफ्रिकेंतून आणलेल्या निग्रो गुलामांच्या श्रमानें ठिकठिकाणीं खाणी खोदावयाच्या व तेथें विपुल रीतीनें सांपडणारें सोनें व रूपें हे जिन्नस आपल्या देशांत पाठवावयाचे असें स्पेनचें धोरण होतें. स्पेन व पोर्तुगाल ह्रीं राष्ट्रें आपापल्या आरमारी सामर्थ्यानें पूर्वे - कडील व्यापार, व अमेरिकेतील वसाहती या बाबतींत इतर युरोपियन राष्ट्रांचा हात शिरकूं न देण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे नुकत्याच पुढें येऊं पहाणाऱ्या इंग्लड व नेदर्लंड या राष्ट्रांस त्यांच्याविषयीं हेवा वाटूं लागून त्या राष्ट्रांशीं आरमारी टक्कर देऊन त्यांची समुद्रावरील सत्ता कमी करावी असें त्यांस साहजिकच वाटूं लागलें ! १५७८ मध्ये पोर्तुगालचा राजा सेबस्टियन हा मरण पावल्यावर तेथील राजवंश संपुष्टांत आला असे जाहीर करून स्पेनचा राजा २ रा फिलीप यानें तें राष्ट्र आपल्या राज्यास जोडून टाकलें ( १५८० ). पोर्तुगालचें स्वातंत्र्य नष्ट झाल्यावर त्या राष्ट्रास उतरती कळा लागली; व पोर्टगालच्या शत्रुराष्ट्रांस योग्य संधि सांपडली ! स्पेनच्या वर्चस्वाखाली असलेल्या डच लोकांनी २ या फिलीपच्या धार्मिक जुलमास कंटाळून १५६६ च्या सुमारास स्पेनचें वर्चस्व झुगारून