पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ वें . ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३३१ असले तरी १६ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच युरोपियन जनतेमध्यें चिकित्सक बुद्धि उत्पन्न होऊन धार्मिक बाबीमध्येही ढवळाढवळ करण्याचा पोपला अधिकार आहे कीं नाहीं याबद्दल विद्वान् लोक उघड रीतीनें टीका- प्रबंध लिहूं लागल्यामुळें, आपण शोधून काढलेल्या जलमार्गाचें, आपल्या आरमारी सत्तेवर स्पेन व पोर्तुगाल या राष्ट्रांस संरक्षण करतां आलें नसतें तर पोपच्या वरील फर्मानानें तादृश असा कांहींच उपयोग झाला नसता हें उघड आहे. इकडे इंग्लंडचा राजा ७ वा हेन्री याच्या नोकरीत असलेल्या कॅबेट नांवाच्या गृहस्थानें वायव्येकडून हिंदुस्थानकडे जाणारा मार्ग सांपडला तर पहावा या हेतूनें प्रयत्न करीत असतां १४९७ मध्ये उत्तर अमेरिकेनजिक असलेल्या न्यू फाउंडलंड बेटाचा शोध लावला. यानंतर बरीच वर्षे इंग्लंडने या भागावर आपली स्थायिक अशी वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न केला नाहीं. इंग्लंडनंतर फ्रान्सनेंही १५२३ मध्ये उत्तर अमेरिकेशीं आपला संबंध जोडला; व १५३४ - इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांचा उत्तर अमेरिकेशी संबंध. मध्यें तर कार्टीयर नांवाच्या फ्रेंच गृहस्थानें सेंट लॉरेन्स आखातांतून आपलें जहाज पुढे नेऊन बेकची वसाहत स्थापन केली. पंधराव्या शतकाच्या शेवटीं हिंदुस्थानचा शोध लावल्यावर पूर्वे - कडील राष्ट्रांशीं व्यापार करून आपल्या राष्ट्राची सांपत्तिक उन्नति करून घेण्यासाठीं पोर्तुगालचे प्रयत्न सुरू झाले. नवीन शोध लागलेल्या प्रदेशांत जाऊन तेथें कायमच्या वसाहती स्थापन करण्याकडे त्यांचें लक्ष्य नव्हतें ! १६व्या शतकांतील पोर्तुगालचा व्यापार. मधील दक्षिण अमेरिकेतील ब्राझील प्रदेशाचा अचानक रीतीनें शोध लागल्यावर त्याठिकाणी पोर्तुगाल- ज्यू लोकांनीं वसाहत स्थापन केली, तेव- ढीच कायती पोर्तुगीज लोकांची कायमची अशी वसाहत असे; पण त्या- खेरीज वसाहती स्थापन करण्याचे त्यांच्याकडून प्रयत्न झाले नाहींत !