पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण ७०० लोकांनिशीं मेक्सिकोमध्यें जाऊन तो सर्व प्रदेश आपल्या ताब्यांत आणला; व यानंतर १५३१ मध्ये पिझोरो नांवाच्या गृहस्थानें तर अवघ्या १८३ लोकांनिशीं दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील पेरू मुलखावर आपलें वर्चस्व प्रस्थापित केलें. मेक्सिको व पेरू येथील मूळचे रहिवाशी थोडे असून ते अशिक्षित व रानटी असल्यामुळे त्यांचें स्पॅनि- अर्ड लोकांपुढें कांहींच चाललें नाहीं. दक्षिण अमेरिकेंत स्पॅनिअर्ड लोकांच्या वसाहती स्थापन होत असतां मँगलीनं नांवाच्या स्पॅनिअर्ड गृहस्थानें तर अमेरिकेच्या दक्षिण किना-यास वळसा देऊन पॅसिफिक महासागरांतून सफर केली, व १५२१ मध्यें चीनजवळ असलेल्या फिलीपाईन बेटांचा शोध लावला. या ठिकाणीं जरी तो मरण पावला तरी त्याच्या अनुयायांनीं आपलीं गलबतें तशींच पुढें हांकरिलीं व सरतेशेवटीं केप ऑफ गुड होपच्या मार्गानें आफ्रिका- खंडास वळसा देऊन त्यांना स्पेनला परत येतां आल्यानें पृथ्वी वाटोळी असल्याची सर्वांची खात्री झाली. वास्को-डी-गामा, कोलंबस, मॅगेलीन या पोर्तुगॉल व स्पेनमधील गृहस्थांनीं हिंदुस्थान व अमेरिका या दोन्ही प्रदेशांचा शोध लावल्या- मुळे, त्या प्रदेशांशीं व्यापार करून तेथें वसाहती स्थापन करण्याचा आपणासच कायतो हक्क आहे असें या राष्ट्रांस वाटू लागल्यास त्यांत कांहींच नवल नव्हतें ! आपल्या या हक्कास कायदेशीर स्वरूप यावें असें वाटून पोर्तुगाल व स्पेन येथील राजांच्या विनंतीवरून, सर्व ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरु या नात्यानें पोपनें एक फर्मान काढून नवीन शोध लाग- लेला प्रदेश, व त्या प्रदेशाकडे जाणारे जलमार्ग वरील दोन राष्ट्रांस विभा- गून देऊन इतर कोणत्याही राष्ट्रानें पोर्तुगाल व स्पेन या राष्ट्रांच्या संमतीखेरीज युरोपच्या बाहेर असलेल्या प्रदेशांशी संबंध ठेवू फर्माविलें. मध्ययुगामध्यें अंतर्राष्ट्रीय करारनामा करावयास ख्रिश्चन धर्माचा मुख्य या नात्यानें पोपला अधिकार आहे असें समजण्यांत