पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ वें. ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३२९ भूगोलाची माहिती होऊन पोर्तुगीज गलबतास वाटेल तेथें संचार करतां यावा, आपल्या राष्ट्राचें आरमार बलाढ्य होऊन परकीय राष्ट्रांशीं दर्यावर टक्कर देतां यावी, या हेतूंनीं प्रेरित होऊन एक वेधशाला स्थापन केली. १४६० मध्यें हेन्री मरण पावला तरी त्याच्यानंतर गादीवर येणाऱ्या पोर्तुगालच्या राजाकडून पोर्तुगीज लोकांस दूरदूरच्या सफरी करण्यास उत्तेजन मिळत गेलें. यावेळी पोर्तुगीज जहाजें आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर दूरदूरच्या सफरी करीत ! १४८६ मध्यें आफ्रिकाखंडाच्या दक्षिण किनाऱ्याचा शोध लागला; व याच मार्गानें आपलें जहाज पूर्वेकडे हांकारीत असतां वास्को- वास्को डी गामा हिंदुस्थानचा शोध लावतो - १४९८. डी-गामा या पोर्तुगीज गृहस्थास यश येऊन, त्यानें १४९८ मध्ये आपलें जहाज हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील कॅलि- कत बंदरास नेऊन भिडविलें. कोलंबस अमेरिकेचा शोध लावतो. १४९२ हिंदुस्थानचा शोध लावण्याचे पोर्तुगीज लोकांचे वरील प्रयत्न सुरू असतां पश्चिमेकडील मार्गानें हिंदुस्थानचा शोध लागला तर पहावा या हेतूनें स्पेनच्या राजाच्या नोकरीस असलेल्या कोलंबस नांवाच्या धाडसी गृहस्थास १४९२ मध्यें दक्षिण अमेरिकेलगतच्या ' वेस्ट इंडिज' बेटांचा अचानक शोध लागून पुढील १०-१२ वर्षांत दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिअर्ड लोकांच्या वसाह तीचा पाया घालण्यांत आला. हा नवीन शोधून काढलेला प्रदेश दिंदुस्थान देश आहे, किंवा फार तर आशिया खंडाचाच भाग आहे, अशी त्यावेळीं कोलंबसची व इतर स्पॅनिअर्ड लोकांची कल्पना होती, व १५१३ बॅलबोआ नांवाच्या गृह- स्थानें पनामाची संयोगभूमि ओलांडून पलीकडे असलेल्या पॅसिफिक महा- सागराचा शोध लावीपर्यंत अमेरिका हैं एक नवीनच खंड आहे अशी कोणाचीही खात्री नव्हती ! दक्षिण अमेरिकेचा शोध लावल्यावर तेथें आपलें वर्चस्व स्थापित करावें असें स्पेनला वाटूं लागलें. १५१९ मध्ये कोर्टस् नांवाच्या गृहस्थानें २१