पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. प्रकरण बुद्धि उत्पन्न होऊन पूर्वापार धर्म समजुती, वेडगळ आचारविचार यांवर विचारी लोकांकडून कडक टीकाप्रहार होऊं लागले. धार्मिक व ऐहिक बाबतींत सुधारणा करावी व आपल्या राष्ट्रांचे उद्योगधंदे वाढवून व्यापार वाढवावा अशी युरोपियन राष्ट्रांमध्यें स्पर्धा उत्पन्न झाली. १४५३ मध्ये आटोमन टर्क लोकांनीं कान्स्टॅटिनोपल शहर हस्त- गत करून युरोप, आशिया व आफ्रिका या तिन्ही खंडांस लागून असलेल्या प्रदेशावर आपलें वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे युरोपच्या पूर्वेकडील चीन, हिंदुस्थान, इराण, अरेबिया वगैरे राष्ट्रांशी असलेल्या पूर्वापार व्यापारास अडथळा आला. इटालियन द्वीपकल्पावरील व्हेनीस, जेनोआ फ्लॉरेन्स या राष्ट्रांचें वैभव व अस्तित्व मुख्यत्वेंकरून पूर्वेकडील व्यापारावरच अवलंबून असल्यानें या लहान लहान राष्ट्रांस उतरती कळा लागली; व आतां पूर्वेकडील राष्ट्रांशीं व्यापार करण्यासाठी दुसरा एखादा जलमार्ग शोधून काढून आपला व्यापार पूर्ववत् प्रस्थापित केल्याखेरीज गत्यंतर नाहीं असें व्हेनीस, जेनोआ या राष्ट्रांप्रमाणेच इतर युरोपियन राष्ट्रांसही बाटूं लागलें. हा नवीन जलमार्ग शोधून युरोपियन राष्ट्रांचें युरोपच्या बाहेर वर्चस्व स्थापण्याचे काम कोणीं पुढाकार घेतला असेल तर तो लहानग्या पोर्तुगाल राष्ट्रानेंच होय ! पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच दर्या- वर्दीपणांत आपल्या राष्ट्रानें पुढें यावें व महमदीधर्मीय मूर लोकांचा पराभव करून इजिप्तशीं व्यापार सुरू करावा यासाठी पोर्तुगालचे प्रयत्न सुरू होते. आफ्रिकेच्या उत्तर किनान्यावरील कडव्या मूर लोकांशीं दोन तीन शतकें टक्कर देण्याचे प्रसंग आल्यानें लोकांप्रमाणे पोर्तुगीज लोकांमध्यें धर्मवेडही शिरलें होतें ! १४१५ मध्ये पोर्तुगालचा राजपुत्र हेन्री यानें जिब्राल्टरच्या किल्ल्यानजीक मूर लोकांचा पराभव करून आफ्रिके- च्या वायव्य किनाऱ्यावरील त्यांची सत्ता संपुष्टांत आणिली. यानंतर हेन्रीनें आपल्या राष्ट्रांतील लोकांस नौकानयनाचें शिक्षण मिळावें, त्यांस पोर्तुगालचा राजपुत्र हेन्री.