पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ वें. ] युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. ३२७ जगाच्या चारपंच- मांश भागावर युरो- पियन राष्ट्रांचे वर्चस्व. माहिती असून अवघ्या पांच शतकांमध्यें पांचही खंडांत त्यांनीं आपापल्या वसाहती प्रस्थापित करून, युरोपियन संस्कृति, युरोपियन आचारविचार यांचा सर्वत्र पगडा बसविला आहे ! जगाचें एकंदर क्षेत्रफळ ५ कोटा १२ • लक्ष चौरस मैल आहे, त्यांपैकी ४ कोटी २५ लक्ष चौरस मैलांच्या विस्तृत प्रदेशावर म्हणजे सरासरी जगाच्या चार- पंचमांश भागावर युरोपियन राष्ट्रांचा व त्यांनीं प्रस्थापित केलेल्या वसाहतींचा अंमल आहे; इतकें असून तद्देशीय लोकांच्या मानानें सर्व जगावर पसरलेली युरोपियन लोकसंख्या फारच थोडी आहे. जगाची एकंदर लोक- संख्या अजमासें १ अब्ज ७२ कोटी आहे, त्यापैकीं युरोपियन गोऱ्या - रहिवाशांची सर्व जगावर पसरलेली लोकसंख्या अवघी ५६ कोटी भरेल. अशाप्रकारें गेल्या पांच शतकांमध्ये युरोपियन राष्ट्रांनीं पांचही खंडांत आपल्या वसाहती स्थापन करून जगाच्या चारपंचमांश भागावर आपलें वर्चस्व कसें प्रस्थापित केलें व त्यास कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या याचें थोडेंसें दिग्दर्शन करण्याचें योजिलें आहे. इ. स. १४५३ मध्यें आटोमन टर्क्स लोकांनी पूर्वरोमन पादशाही उध्वस्त करून कान्स्टॅटिनोपल शहर हस्तगत केल्यापासून युरोपच्या इति- हासास निराळेंच वळण लागलें. चवथ्या शतकापासून आज हजार वर्षे, पर्शि- यन, सॅरासीन, अरब वगैरे टोळ्यांचा प्रतिकार करून पूर्वरोमन पादशाहीनें युरोपचें संरक्षण केलें होतें, परंतु आटोमन टर्क लोकांच्या वाढत्या सत्तेस आळा `घालण्याचे काम मात्र तिला यश आलें नाहीं. महमदीधर्मीय टर्क लोकांनीं पूर्वरोमन पादशाही संपुष्टांत आणल्यावर तेथील विद्वान् लोकांनीं पश्चिम युरोपकडे पळ काढून आपल्याबरोबर प्राचीन ग्रीक व रोमन लोकांचें ज्ञान- भांडार नेल्यामुळें युरोपियन जनतेच्या आचारविचारांत, त्यांच्या सामाजिक, धार्मिक, व राजकीय कल्पनांमध्ये मध्ययुगामध्यें जी शिथिलता आली होती ती नाहींशी होऊन नवजीवनाचा संचार झाला. जनतेमध्यें चिकित्सक