पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ रें. ] जर्मनीमधील धर्मसुधारणेची चळवळ. ३१ जर्मनीमध्ये टेटसेल या धर्माधिकाऱ्याने अशी पत्रके मोठ्या प्रमाणांत विकून किफायतशीर व्यापार चालविला असल्याने लोकांना त्याच्या या कृत्याबद्दल बराच तिटकारा वाटू लागला. यावेळीं मार्टीन ल्यूथरनें ३१ आक्टोबर १५१७ मध्ये विटॅमबर्गमधील चर्चच्या दर- वाज्यावर अशा प्रकारच्या पत्रकांविरुद्ध ९६ मुद्दे असलेला एक कागद चिकटावून, आपल्या कृत्याचें समर्थन करण्यासाठी टेटसेलला आव्हान केलें. ल्यूथरच्या या निर्भय कृत्यानें त्याच्याबद्दल सर्वोस आदर वाटून रोमनचर्चविरुद्ध लोकमत बरेंच क्षुब्ध होऊं लागलें; तरी यावेळी पोप- च्या कृत्याचें समर्थन करणारे लोकही थोडेथोडके नसल्यामुळे या धार्मिक विषयावर जर्मनीमध्ये कडाक्याचा वादविवाद सुरू झाला. 'पातकापासून मुक्त करणारी पत्रकें' याविरुद्ध ल्यूथरनें जे ९६ मुद्दे प्रसिद्ध केले, त्यावेळीं रोमन कॅथलिक पंथाचा त्याग करून दुसरा धर्मपंथ स्थापन करावा असा त्याचा मुळींच विचार नव्हता ! परंतु ल्यूथरच्या वरील कृत्यानें चिडून जाऊन पोपच्या कृत्याचें समर्थन करणाऱ्या मंडळींनी जेव्हां त्याच्याविरुद्ध चळवळ सुरू केली, तेव्हां धार्मिक बाबींचा सर्व बाजूंनी शांतपणें विचार करावा असें त्यास बाटूं लागलें. अशाप्रकारें धार्मिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी धर्मावरील पुस्तकें वाचीत असतांना त्याला आढळून आलें कीं, वर सांगितलेल्या पत्रकाप्रमाणेंच बायबलला संमत नसलेल्या दुसऱ्या कित्येक गोष्टीही रोमन कॅथलिक पंथांत घुसडल्या गेल्या असल्यानें या सर्व गोष्टींवरही टीकाप्रहार करतां येण्यारखा आहे अशाप्रकारें मार्टीन ल्यूथरचें अध्ययन चालू असतां त्याला आढळून आलें कीं, रोमशहरांतील धर्मगुरूंस ख्रिस्तीधर्माचें आधिपत्य कोणी दिलें नसून तें रोममधील पोपनींच बळकावलें आहे ! तेव्हां पोपची ख्रिस्तीधर्मावरील असलेली सत्ता आपणास मान्य नाहीं हें दाखविण्यासाठीं त्यानें १६२० मध्यें एक चोपडें प्रसिद्ध केलें. इतक्या थरावर गोष्ट गेली, तेव्हां रोमन कॅथलिक धर्माविरुद्ध चळवळ चालविणाऱ्या ल्यूथरचा रोम शहरांतील १० वा लियो