पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण या पोपला राग आला व त्यानें ल्यूथरला ' धर्मबहिष्कृत ' केलें असल्याचें जाहीर केलें ! परंतु पोपच्या या कृत्यानें न डगमगतां आपणास बहिष्कृत केलें आहे अशा प्रकारचें पोपकडून आलेलें पत्रकही त्यानें जाहीर रीतीनें जाळून टाकलें ! पोपकडून ल्यूथरला धर्मबहिष्कृत करण्यांत आल्यावर जर्मनीमधील निरनिराळ्या संस्थानांतील राजेरजवाडेही ल्यूथरला आपापल्या संस्थानांत येण्याचा प्रतिबंध करतात कीं काय असें वाटूं लागलें होतें. ल्यूथरच्या पक्षांतील मंडळी व पोपच्या बाजूची मंडळी यांच्यामध्यें जर्मनीत वाक्कलह सुरू झाला. तेव्हां या सर्व प्रश्नांचा शांतपणें निकाल लावावा व कलहाचें कारण नष्ट करावें असें ' पवित्र रोमन साम्राज्या'च्या बादशाही पदावर नुकत्याच आलेल्या ( १५१९) ५ व्या चार्लसला वाहूं लागलें व त्यानें या सर्व बाबींचा विचार करण्यासाठीं वर्क्सशहरीं एक धर्मपरिषद भरवून या परिषदेमध्यें ल्यूथरनें वर्म्स येथील धर्म- परिषद. आपलें म्हणणें पुढें मांडावें असें फर्माविलें. तेव्हां ल्यूथरनेही बायबलचा आधार घेऊन रोमन कॅथलिकंपथीय धर्माधिकारी आपणाशी वादविवाद करण्यास तयार असल्यास आपण आपलें म्हणणें पुढें मांडूं असें जाहीर केलें. अशा रीतीनें वर्म्स येथील बैठकीपासून जर्मनी- मध्ये धर्मविषयक कलहास सुरुवात झाली ! वर्म्स येथील बैठकीत चाललेल्या वादविवादाचा एकदां कायतो कायमचा निकाल लावावा असें अननुभविक ५ व्या चार्लसला वाटूं लागलें. यावेळीं त्याचें वय २१ वर्षांचें होतें, तरी तो मोठा धोरणी होता व ल्यूथरच्या बाजूचा निकाल दिल्यास जर्मनीमध्ये एकदम दोन पक्ष निर्माण होऊन आपल्या बादशहां पांचवा चार्लस. 1 अगोदरच निर्बळ असलेल्या पादशाहीची स्थिति अधिकच कमकुवत होईल असें त्यास वाटूं लागलें. चार्लसच्या मनांतून रोमन कॅथलिक पंथांत अस्तित्वांत असलेल्या वेडगळ समजुती काढून टाकून सुधारणा करण्याची