पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण नसून, खरी सुधारणा पाहिजे असेल तर पहिल्याप्रथम आपण आपल्या मनाचीच पवित्रता राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारें त्याच्या मनामध्यें गूढ गोष्टींचा विचार चालला असतां त्यानें विटेमबर्ग या विश्व-न विद्यालयांत अध्यापकाचें काम पत्करलें होतें; व तेथें अध्यापकाचें काम करीत असतां एका प्रसंगानें तो प्रसिद्धीस आला. १५१७ मध्ये जर्मनीमध्ये जॉन टेटसेल नांवाच्या एका धर्माधिकाऱ्यानें 'पातकापासून मुक्त करणारी पत्रकें' विकण्याचा उपक्रम सुरू केला. बायबल मधील एका वाक्याच्या आधारें अशीं पत्रके विकण्याचा प्रघात पहिल्याप्रथम पाडण्यांत आला होता. बायबलमध्यें सांगितलें आहे कीं, पातकाचें क्षालन. करावयाचें असेल तर पातकी मनुष्यानें दोन गोष्टींकडे मुख्यत्वेंकरून लक्ष्य पातकापासून मुक्तता करणारी पत्रके, द्यावयास पाहिजे. या दोन गोष्टी म्हणजे ( १ ) पश्चात्ताप व (२) योग्य शिक्षा या होत ! या दोन गोष्टींपैकीं पातकाबद्दल उपरती होऊन पुनः पातक न करण्याचा दृढनिश्चय करणें ही गोष्ट. मुख्य होती, तरी ती गोष्ट बाजूलाच राहून पातकी मनुष्याला योग्य शिक्षा देण्याऐवजीं एखाद्या पुण्यकारक कृत्याला त्यानें मदत केली तरी चालेल, असें समजण्यांत येऊं लागलें. यानंतर पातकी मनुष्यापासून चर्चच्या पवित्र कामासाठीं मदत मिळावी म्हणून वर सांगितल्याप्रकारची पत्रके विकण्य येऊं लागलीं. पहिल्या पहिल्यानें अशा प्रकारच्या पत्रांची संख्या कमी होती, तरी हलके हलके रोम शहरांतील मोठमोठालीं चर्चेस, राजवाडे, व ऐषआरामाचीं व विलासाची साधनें निर्माण करण्यासाठीं अशा प्रकारच्या 'पत्रकांपासून बरीच प्राप्ति होईल असें पंधराव्या शतकांतील विलासी क ऐषआरामांत लोळणाऱ्या धर्मगुरूंना वाटू लागल्यामुळे हीं पत्रके जास्त प्रमाणांत विकण्यांत येऊं लागलीं इतकेंच नव्हे, तर हा व्यापार सुरळीत व व्यवस्थित रीतीनें चालावा म्हणून वेगवेगळ्या पातकांबद्दल वेगवेगळ्या किंमतीचीं पत्रकें देखील ठरविण्यांत आलीं !