पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण २१ वें. युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती व अंकित प्रदेश. गेल्या पांच शतकांमध्यें युरोपियन राष्ट्रांनीं युरोपच्या बाहेर आपापल्या वसाहती स्थापन करून व इतर रीतीनें पांचही खंडांतील विस्तृत मुलूख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीनें आपल्या वर्चस्वाखालीं आणल्यामुळे जगाच्या इतिहासावर व संस्कृतीवर महत्त्वाचे परिणाम झालेले आहेत. पंधराव्या शतकाच्या पूर्वी युरोपियन जनतेस युरोपच्या बाहेर - असलेल्या जगाची फारच अंधुक कल्पना होती ! हिंदुस्थान, 'चीन वगैरे प्राचीन कालापासून प्रसिद्ध असलेले देश देखील प्रत्यक्ष कोठें आहेत, त्यांचा विस्तार केवढा आहे, तेथील संस्कृति, धर्म, आचारविचार वगैरे बाबींसंबंधाची त्यांस असलेली माहिती काय ती ऐकींव व तुटपुंजी •असून ती बरीच चुकीचीही असे. व्यापार व उद्योगधंदे यांमध्ये हे देश फार पुढें गेलेले आहेत वगैरे गोष्टी त्यांस ऐकून माहीत होत्या. त्या राष्ट्रांशीं प्रत्यक्ष व्यापार करण्याचा त्यांस कधींच प्रसंग आला नाहीं; पॅलेस्टाईन, अरेबिया, मध्य आशिया येथील लोकांच्या मध्यस्थीनेंच खुष्कीच्या मार्गानें युरोपचा हिंदुस्थान व चीन या देशांशीं व्यापार चाले. अशा प्रकारें प्राचीन कालापासून प्रसिद्ध असलेल्या देशांविषयीं माहितीच्यासंबंधानें जर ही स्थिति, तर अमेरिका, आस्ट्रेलिया, वगैरे अज्ञात प्रदेशासंबंधानें त्यांस कांहींच माहिती नसली तर त्यांत कांहींच नवल नव्हतें. अटलांटिक महासागरापलीकडे अमेरिका खंड असेल, आफ्रिका खंडास वळसा देऊन हिंदुस्थान व चीन या देशांकडे जलमार्गानें आपणांस जातां येईल अशी त्यांची मुळींच कल्पना नव्हती. भूमध्य समुद्र व त्याच्या सभोवताली असलेला प्रदेश याचीच त्यांना काय ती माहिती असे. अशाप्रकारें पंध- राव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपियन राष्ट्रांस जगाची इतकी त्रोटक