पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२४ रशियांतील क्रान्तिकारक गुप्त कट. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण कारक विचारांनीं प्रेरित झालेल्या लोकांकडून प्रचलित असलेली जुलमी राज- सत्ता उलथून पाडण्यासाठीं भयंकर कट होऊं लागले ! सरतेशेवटीं रशियामध्ये 'निहीलिस्ट ' नांवाचा एक भयंकर क्रान्तिकारक पक्ष निर्माण होऊन, या पक्षाच्या प्रेरणेनें रशियामध्ये वारंवार राजकीय खून होऊं लागले. १८८१ मध्ये एक गुप्त कट करण्यांत होऊन दुसऱ्या अलेक्झांडरचा वध करण्यांत आला ! तेव्हां आपल्या साम्राज्यांत क्रान्ति- कारक विचारांचें शिरलेलें बीज समूळ नष्ट करण्यासाठी रशियन सरकारानें कडक उपाय योजून पुष्कळ लोकांस फांशीं दिलें; तरी देखील 6 निहीलिस्ट' पंथाची ही क्रान्तिकारक चळवळ नष्ट झाली नसून ती अधीकच जोराने सुरू झाली ! इंग्लंडचा गेल्या हजार वर्षांचा इतिहास `पाहिला तर तेथील राज्यकर्त्यांनीं लोकांच्या सल्ल्यानें राज्यकारभार कर ण्याचें धोरण पहिल्यापासून स्वीकारून राज्यकारभारांत लोकांना अधिका- धिक भाग घेऊं दिल्यानें फ्रान्स, रशिया वगैरे देशांतील राजक्रान्तीचे प्रकार इंग्लडच्या इतिहासांत आढळून येत नाहींत. परंतु रशियांतील बादशहांनी अशाप्रकारचें प्रगतिपर धोरण कधींच स्वीकारलें नाहीं ! 'हम करोसो कायदा' या न्यायानें लोकांच्या आकांक्षा चेपून टाकण्याचा प्रयत्न झाल्यामुळें, रशियामधील जनतेच्या लोकनियंत्रित राज्यपद्धतीच्या कल्पना नष्ट तर झाल्या नाहीत, पण त्या आंतल्या आंत धुमसूं लागून संधी सांप- डतांच त्यांचा भयंकर स्फोट होऊन फ्रान्समधील राज्यक्रान्तीप्रमाणें राशि- यांतही क्रान्ति होणारसें भासूं लागलें. गेल्या महायुद्धांत अशी संधि सांप- डतांच युरोप व आशिया या दोन खंडांतील विस्तृत प्रदेशावर पसरलेला - व भक्कम वाटणारा डोलारा हां हां म्हणता ढांसळून पडून रशियामध्यें जिकडे तिकडे बेबंदशाही माजली ! लोकांच्या मनांतील प्रगमनशील