पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० वें. ] गेल्या शतकांतील इंग्लंड व रशिया. ३२३ दक्षिण युरोपमध्यें रशियाच्या महत्त्वाकांक्षेस अडथळा आला, तरी रशियानें याच वेळीं आशिया खंडांतील मुलूख विस्तृत करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. रशियाचा आशिया खंडांतील साम्राज्यविस्तार एकसारखा वाढत जाऊन पूर्व आशियामध्ये आपणास टक्कर देण्यास रशियाचा आशिया- खंडांतील विस्तार. कोणीच नाहीं असें रशियास वाटूं लागलें होतें. रशियन साम्राज्याचा एकोणिसाव्या शतकामध्यें असा विस्तार होत असतां रशियाच्या अंतःस्थ बाबींमध्येही यावेळी महत्त्वाच्या घडामोडी चालल्या होता. झार २ रा अलेक्झांडर ( १८५५- १८८१ ) याचें धोरण आपल्या पूर्वजांपेक्षां अधिक उदार असल्यानें त्यानें आपल्या साम्राज्यांत एक महत्त्वाची सुधा- रणा घडवून आणून सर्वांकडून धन्यवाद घेतले ! १८५८ मध्यें झार अलेक्झांडरनें सरकारी जमिनीवर काबाडकष्ट करून आपले पोट भरणाऱ्या दोन कोटी सर्व लोकांची गुलामगिरीतून सुटका केली; व त्याचप्रमाणें १८६१ मध्ये रशियांतील अमीर, उमराव व श्रीमंत लोक यांच्या मालकीच्या असलेल्या जमिनीवर काबाडकष्ट करून आपलें पोट भरणाऱ्या सर्ब लोकांचीही गुलामगिरींतून सुटका करून देऊन रशियांतील गरीब व निकृष्ट वर्गावर होत असलेल्या जुलमास आळा घातला. दुसऱ्या अलेक्झांडरकडून करण्यांत आलेली ही महत्त्वाची सुधा- रणा पाहून रशियांतील सुलतानी व अनियंत्रित राज्यपद्धतीचा आतां शेवट होऊन, तेथें इतर युरोपियन राष्ट्रांप्रमाणें लोकनियंत्रित राज्यपद्ध पुरस्कार करण्यांत येईल अशी सर्वांस आशा वाटूं लागली ! परंतु रशियन जन- तेच्या कल्पनेप्रमाणें लोकनियंत्रित राज्यपद्धतीचा पुरस्कार करण्याचें रशियन झारनीं नाकारल्यामुळें रशियन जनतेची निराशा झाली, व तेथील क्रांति - सर्व रशियांतील लोकांची गुलामगिरी- न सुटका - १८६१.