पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• ३२२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण बाल्कनदीपकल्पांत लहान लहान स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचें बर्लिनच्या परिषदेनें ठरविलें. बर्लिनच्या परिषदेप्रमाणे खालील व्यवस्था करण्यांत आली. ( अ ) मॉन्टेनिग्रो, सर्व्हिया व रुमानिया हीं बाल्कन संस्थानें पूर्णपणें स्वतंत्र करण्यांत आली. ( आ ) बल्गेरियाला स्वराज्याचे हक्क देण्यांत येऊन या संस्थानाने दरवर्षी कांहीं खंडणी टर्कीच्या सुलतानास द्यावी असें ठरविण्यांत आलें. (इ) बल्गेरियाच्या दक्षिणेकडे असलेल्या कांहीं भागाचें रुमानिया नांवाचें एक संस्थान स्थापन करण्यांत येऊन तें टर्कीच्या लष्करी अमलाखाली ठेवण्यांत आलें. (ई) बोस्निया व हरझे- -गोविना हे दोन प्रांत तेथील लोकमताविरुद्ध होतें तरी ऑस्ट्रियाच्या ताब्यांत देण्यांत आले. ( उ ) रशियाला काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील बॅसरबिया हा प्रांत मिळून आशियामायनर प्रातांतील कांहीं प्रदेश मिळाला. अशाप्रकारें बर्लिनच्या परिषदेकडून व्यवस्था करण्यांत येऊन राशि- याच्या दक्षिण युरोपमधील महत्त्वाकांक्षेस अडथळा आणला असल्यामुळे. बर्लिनच्या तहानें रशियाचें साहजिकच समाधान झालें नाहीं ! बर्लिनच्या तहानंतर बाल्कनद्वीपकल्पांतील लहान लहान संस्थानां- मध्यें महत्त्वाच्या सुधारणा होऊन तीं राष्ट्रें भरभराटीस येऊं लागलीं होतीं. बर्लिनच्या तहानंतर किन राष्ट्र. १८८१ मध्यें रुमानियानें पहिल्या चार्लसच्या अमलाखालीं तेथें राजसत्ता स्थापन केली. १८८२ मध्यें सर्व्हियामध्येही राजसत्ता स्थापन करण्यांत येऊन पहिल्या मीलनला राज्यपद देण्यांत आलें. याच सुमारास बल्गेरिया संस्थानांतही महत्त्वाच्या सुधारणा झाल्या ! बल्गेरियापासून अलग कर- यांत येऊन टर्कीच्या लष्करी अमलाखाली असलेल्या रुमानिया संस्था-- नानें १८८५ मध्ये टर्कीविरुद्ध बंड केलें व तें राष्ट्र बल्गेरियास जाऊन मिळालें.