पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० वें. ] गेल्या शतकांतील इंग्लंड व रशिया. ३२१ सॅन स्टेफीनोच्या तहास इतर युरोपियन राष्ट्रांची मान्यता मिळाल्याखेरीज तो कायम समजण्यांत येऊं नये अशी रशियाकडे मागणी केली, व आपल्या मागणीप्रमाणें वर्तन न झाल्यास आपणास रशियाशीं युद्ध करावें लागेल असें जाहीर केलें. सॅन स्टेफीनोच्या तहानें रशियाचें बाल्कनद्वीपकल्पावर पूर्णपणें वर्चस्व बसल्यास, आपल्या बाल्कनद्वीपकल्पाकडील महत्त्वाकांक्षेस जोराचा अडथळा येण्याचा संभव आहे, असें ऑस्ट्रियासही वाटुं लागल्यामुळे ऑस्ट्रियानें इंग्लंडच्या मागणीस दुजोरा दिला ! इतके दिवसपर्यंत रशियन झारनीं आपल्या मनामध्ये बाळगलेली महत्त्वाकांक्षा सफल होण्याचा समय आला असतां, -इंग्लंड व ऑस्ट्रिया हीं राष्ट्रं या महत्त्वाकांक्षेच्या आड येत आहेत हें पाहून रशियानें या दोन्ही राष्ट्रांशी टक्कर देण्यास मागें पुढें पाहिलें नसतें; परंतु यावेळीं खुद्द रशियाच्या अंतस्थ राजकारणांत क्रांतिकारक चळवळ्या • लोकांनी गडबड केल्यामुळे या प्रसंगी रशियास माघार घ्यावी लागून इंग्लंड व आस्ट्रिया या राष्ट्रांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यावें लागलें. या वेळीं इंग्लंड, ऑस्ट्रिया व रशिया यांच्या कलहांत हात घालून आपल्या राष्ट्रानें मध्यस्ती करून आपल्या नुकत्याच स्थापन झालेल्या राष्ट्राचा दर्जा वाढ- वावा असें जर्मनीचा मुख्य प्रधान व्हॉन बिस्मार्क यास वाटून त्यानें आपल्या बर्लिन शहरी सॅन स्टेफीनोच्या तहासंबंधीं विचार करण्यासाठीं सर्व युरोपियन राष्ट्रांच्या प्रतिनिधींची सभा बोलाविली. बर्लिन येथील परिषद १८७८ मध्यें बर्लिन येथें जमलेल्या युरोपियन राष्ट्रांतील मुत्सयांस रशियाच्या वाढत चाललेल्या साम्राज्यविस्ताराबद्दल भीति वाटत असल्या- मुळे रशियाच्या महत्त्वाकांक्षेस आळा घालावा लागला. रशियाचा कॉन्स्टटिनोपलकडे फार दिवसांपासूनचा डोळा असल्यामुळे पुनः संधि सांप- डल्यास टर्कीवर स्वारी करण्यास शिया मागें पुढें पाहणार नाहीं असें वाटून टर्की व रशिया यांची एकमेकांशी टक्कर होऊं नये म्हणून १८७८.