पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण च्या सुलतानानें, वाटेल तें करून हा दंगा मोडण्याचा आपल्या सैनि- कांस हुकूम दिला. टर्कीच्या सुलतानाकडून अशा प्रकारचा हुकूम मिळतांच टर्कीच्या सैन्याकडून करण्यांत आलेल्या अनन्वित कृत्यास तर सीमाच उरली नाहीं ! टर्किश स्वारांनीं आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व स्त्रीपुरुषांची कत्तल केली ! टर्कीच्या या अनन्वित कृत्यांचा सर्व युरोपियन राष्ट्रांस त्वेष आला ! रशियाच्या झारला तर टर्कीवर सूड उगविण्याच्या मिषानें आपली महत्त्वाकांक्षा सफल करून घेण्याची हीच उत्तम संधि आहे असें वाटून दुसऱ्या अलेक्झांडरने ( १८६६ - १८८१ ) टर्कीशी युद्ध जाहीर केलें ( १८७७ एप्रिल ). लढाई पुकारण्यांत आल्यावर जून महिन्यांतच रशियन सैन्यानें डॅन्यूब नदी ओलांडली, व एका महिन्याच्या आंतच बाल्कनद्वीपकल्पा- तील डोंगराळ प्रांत आपल्या हस्तगत करून घेतला. यावेळीं रशियन सैन्यास एकदम कॉन्स्टॅटिनोपल शहरावर चालून जातां आलें असतें, परंतु ओस्मान पाछा नांवाच्या वीरपुरुषानें सैन्य जमवून कॉन्स्टॅन्टिनोपलकडे चाल करणाऱ्या रशियन सैन्यास थोपवून धरलें. पांच महिनेपर्यंत प्लेव्हना येथें आश्रय धरून त्यानें रशियन सैन्याविरुद्ध टिकाव धरला; परंतु सरते- शेवटी १८७७ च्या डिसेंबर महिन्यांत नाइलाजास्तव त्यास शत्रूस शरण जावें लागलें. लेव्हना है मजबूत ठिकाण पडल्यावर रशियन सैन्याच्या कॉन्स्टटि- नोपलकडे जाणाऱ्या मार्गात कोणताच आडथळा उरला नाहीं ! या वेळीं रशियन सैन्यास थोपवून धरण्यास टर्कीींचें सैन्य अगदींच असमर्थ असल्यानें थोडक्याच दिवसांत रशियन सैन्य कॉन्स्टॅटिनोपल शहरानजीक दाखल सॅन स्टेफीनो येथील तह १८७८ मार्च. होऊन १८७८ च्या मार्च महिन्यांत सॅनस्टेफीनो येथें टर्कीला तह कबूल करणें भाग पडलें. या तहाप्रमाणें अमलांत येणारी व्यवस्था मान्य झाली असती तर युरोपमधून टर्कीींचें अस्तित्वच संपलें असतें असें म्हणण्यास हरकत नाहीं. परंतु या वेळीं इंग्लंडनें मध्ये पडून