पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० वं . ] गेल्या शतकांतील इंग्लंड व रशिया. ३१९ कबूल करावें लागलें. १८२९ च्या सुमारास रशियानें टर्कीला अॅड्रियानोपल येथें तह करावयास लावून ‘टर्की'च्या साम्राज्यांतील सर्व्हिया मोल्डेव्हिया, वायलेछिया या प्रांतांस स्वराज्याचे कांहीं हक्क देण्याचें टर्कीकडून कबूल करून घेतलें. टर्की साम्राज्य अशा रीतीनें विस्खलित करून आपली महत्त्वा- कांक्षा लवकरच पूर्ण करून घेतां येईल अशी झार निकोलस ( १८२५- १८५५) यास आशा वाटू लागली. टर्कीच्या • रशियाच्या झारची महत्त्वाकांक्षा. साम्राज्याचा आतां वृद्धापकाल झाला असून तें फार दिवस जिंवत टिकणें शक्य नाहीं असें झार निकोलसला वाटून बिचाऱ्या टर्कीस वृद्धापकाळच्या वेदना सोसावयास लावण्यापेक्षां त्याचा एकदम नाश करून टाकणेंच बरें असा पोक्त विचार करून, निकोलसनें कांहीं कारण नसतांना १८५३ मध्ये एकदम टर्कीच्या मुलखावर स्वारी केली ! टर्कीच्या साम्राज्याचा वृद्धापकाळ झाला असून तें फार दिवस जिवंत टिकणें शक्य नाहीं हें जरी रशियन झारचें अनुमान कदाचित् खरें असलें, तरी त्या साम्राज्याचे वारस आपणच आहोंत अशी रशियन झारनें स्वतःची खोटीच समजूत करून घेतली होती ! रशियाची ही चुकीची समजूत दुरुस्त करण्यासाठी इंग्लंड व फ्रान्स या दोन राष्ट्रांनी क्रिमियन युद्धांत टर्कीस मदत करण्याचें ठरविलें, व युरोपियन राष्ट्रांच्या या मदतीमुळेच रशियन झारची महत्त्वाकांक्षा त्यावेळेस सफल झाली नाहीं. यानंतर कांहीं वर्षे बाल्कनद्वीपकल्पांत कांहींच गडबड झाली नाहीं. परंतु १८७५ च्या सुमारास टर्किश सुभेदारांच्या जुलमी वर्तना- मुळे बॉस्निया प्रांतांत दूंगा झाला. यावेळीं बॉस्नियन लोकांनीं टर्की- च्या विरुद्ध बराच टिकाव धरला होता, परंतु आपणास बॉस्निया प्रांतांतील दंगा लवकर मोडतां आला नाहीं तर ही चळवळीची लाट आपल्या बॉस्निया प्रांतांतील दंगा. अंमलाखालीं असलेल्या सर्व ख्रिश्चन प्रांतांमध्यें पसरेल असे वाटून टर्की-