पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण लाखालीं असलेल्या निरनिराळ्या प्रांतांचें एक संघटित राष्ट्र स्थापन करून तेथील भिन्न धर्मीय लोकांस कांहीं राजकीय हक्क देण्याचा टर्कीनें मुळींच प्रयत्न केला नाहीं. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून टर्कीच्या जुलमी व अनि- यंत्रित अधिकारामुळें त्याच्या ताब्यांत असलेल्या ख्रिश्चन प्रजाजनावर अत्याचार होऊं लागला. युरोपच्या दक्षिणेकडे व पूर्वेकडे असलेल्या प्रदेशांतील ख्रिश्चन लोक स्लाव्ह व ग्रीक जातींचे असत ! ग्रीस व त्याच्या ख्रिश्चन प्रजाजनावर जुलूम. आसपासचा प्रांत यांमध्यें ग्रीक लोक रहात असून, 'स्लाव्ह' लोकांच्या' सर्बस्, रुमानियन्स, बल्गेरियन्स, 'मॉन्टेनिग्रन्स ' वगैरे टोळ्या टर्कीच्या अमलाखाली असलेल्या बाल्कनद्वीपकल्पांत रहात होत्या.. सरतेशेवटीं आपल्या महमदी धर्मीय राज्यकर्त्यांकडून होणाऱ्या जुलमास कंटा- ळून ग्रीक व स्लाव्ह लोकांनी एकोणिसाव्या शतकांच्या प्रारंभापासून स्वातंत्र्य- प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचा उपक्रम सुरू केला. टर्कीच्या अमलाखालीं अस- लेल्या बाल्कनद्वीपकल्पांतील स्लाव्ह लोकांची व रशियन लोकांची एकच जात असल्यामुळे रशियाकडून त्यांच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नास सहानुभूति मिळत गेली ! दक्षिणेकडे आपले वर्चस्व स्थापन करून भूमध्यसमुद्रावर हुकमत गाजवावी अशी रशियाची फार दिवसांपासूनची महत्त्वाकांक्षा असल्यानें बाल्कन संस्थानांस आपली सहानभूति दाखविण्यासाठीं म्हणून टर्कीच्या साम्राज्यावर मारक प्रहार करण्याचा रशियानें उपक्रम केला. १८२१ सालीं आपल्या जुलमी राज्यकर्त्यांची सत्ता उलथून पाडून आपल्या राष्ट्रास स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न पहिल्या प्रथम ग्रीक राष्ट्रानें केला ! १८२७ च्या सुमारास ग्रीक लोकांच्या प्रयत्नास इंग्लंड व फ्रान्स या राष्ट्रांचें साहाय्य मिळून लागलीच नॅव्हरीनो येथें टर्कीच्या आरमाराचा विध्वंस करण्यांत आला. त्यानंतर १८२७ मध्यें रशियानें या युद्धांत ग्रीला मदत केल्यानें टकचा पराभव होऊन त्यास ग्रीकचें स्वातंत्र्य