पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० वॅ. ] गेल्या शतकांतील इंग्लंड व रशिया. ३१७ पौर्वात्य पद्धतीचे असत. परंतु १७ व्या शतकांत पीटर धी ग्रेटच्या अम- दानींत ( १६८९ - १७२५ ) रशियानें आपल्या राज्यांत शिरलेलें पौर्वात्य चटण टाकून देऊन युरोपियन सुधारणा व आचारविचार यांचा स्वीकार रशियाचें पूर्व वृत्त. केला. पीटर धी ग्रेटनें सर्व युरोपखंडभर प्रवास करून आपल्या माहितीचा व अनुभवाचा फायदा आपल्या राष्ट्रास करून देऊन रशियास अर्वाचीन पद्धतीचें एक युरोपियन राष्ट्र बनविलें. पुढें कॅथराईन धी ग्रेट या राशीच्या अमदानींत ( १७६२-१७९५ ) रशियानें युरोपियन राजकारणांत हात घालून पोलंडचे लचके तोडण्यांत भाग घेतला होता; व तदनंतर पहिल्या आलेक्झांडरच्या कारकीर्दीत (१८०१ - १८२५ ) नेपोलियनची सत्ता उलथून पाडण्यामध्ये रशियानें पुढाकार घेतला होता. १८२५ पासून आतांपर्यंत तर दक्षिणेकडे आपलें साम्राज्य विस्तृत करून टर्कीचा विध्वंस करावयाचा व पूर्वेकडे आशियाखंडांत आपले वर्चस्व स्थापन करावयाचें अशी रशियन झारची महत्त्वाकांक्षा होती ! टर्की चें साम्राज्य. रशिया व टर्की यांमधील वरचेवर उपस्थित होणाऱ्या वैमनस्याचें कारण नीट लक्ष्यांत येण्यासाठी टर्कीच्या साम्राज्याकडे आपणास दृष्टि फेंकली पाहिजे. चवदाव्या व पंधराव्या शतकांत आटोमन टर्कस् नांवाच्या महमदी धर्मीय लोकांनी पूर्व - रोमन पादशाहीचा विध्वंस करून टर्कीींचें साम्राज्य स्थापन केलें व कॉन्स्टॅटिनोपल ही आपली राजधानी केली. हलके हलके टर्कीचें साम्राज्य विस्तृत होऊन युरोपचा दक्षिण व पूर्वभाग, आफि- केचा उत्तर किनारा, सीरिया, आशिया मायनर वगैरे प्रदेश टर्कीच्या अम- लाखालीं आणण्यांत आले. या टर्कीच्या सम्राटास सुलतान अशी पदवी असून त्याच्या हातांत अनियंत्रित सत्ता असे. त्याच्या हातांखालील साम्रा- ज्याच्या निरनिराळ्या प्रांतांवरील अधिकान्यास ' पाछा' अशी पदवी असून सुलतानाच्या हुकमानें ते अधिकार गाजवीत असत. टर्कीच्या अम