पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२. ] जर्मनीमधील धर्मसुधारणेची चळवळ. २९ अशा प्रकारें रॉइचलिन, इराझमस वगैरे ग्रंथकारांनी व विद्वान् लेखकांनी जरी ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांवर टीका करून त्यांची कृत्यें चवाठ्यावर आणिलीं होतीं, तरी रोमन कॅथलिक धर्मापासून फुटून नवीन “सुधारलेला धर्मपंथ स्थापन करण्याचा या विद्वान् लेखकांचा मुळींच विचार नव्हता. ख्रिस्ती धर्मामध्यें सुधारणा करावी, व पूर्वीप्रमाणेंच धर्माधिकान्यांस आपलें नैतिक आचरण शुद्ध ठेवावयास लावावें अश प्रकारचा या विद्वानांकडून प्रयत्न होत असे. परंतु पुढील पिढीतील लोकांनी जेव्हां रोमन कॅथलिक पंथांतून फुटून नवीन धर्मपंथ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हां या विद्वान् लेखकांस फारच वाईट वाटलें व त्यांनी नवीन पिढीतील धर्मसुधारक लोकांस प्रोत्साहन देण्याचें नाकारलें. परंतु या विद्वान् लेखकांनीं धर्मसुधारणा करण्याचें प्रत्यक्ष प्रोत्साहन दिले नसलें तरी यांनी त्या वेळच्या धार्मिक मार्टीन ल्यूथर १४८३ - १५४६ अन्यायावर टीकाप्रहार करून पुढे होणाऱ्या धर्मसुधारणेची पूर्वतयारीच करून ठेवली होती 2 या विद्वानांनीं अशा प्रकारें लोकांची मनें तयार ठेवल्यामुळे मार्टीन • ल्यूथरला ' प्रॉटेस्टंट पंथा'ची स्थापना करतां आली. मार्टीन ल्यूथरचा जन्म थ्यूरिंजिया प्रांतांत झाला असून त्याचें घराणें फारच गरीबीचें होतें. छोट्या मार्टीननें वाकलीच्या धंद्यांत पडावें असें त्याच्या आईबापांस वाटून त्याला विश्वविद्यालयांत पाठविण्यांत आलें. परंतु मार्टीनचा वकिलीच्या धंयाकडे मुळींच कल नव्हता. त्यानें १५०५ मध्येंच आगस्टन आर्डर ऑफ फायर " या पंथाचा स्वीकार करून धार्मिक बाबींचा अभ्यास करण्यासाठीं १५१० मध्यें तो रोमशहरीं जाण्यासाठीं निघाला. रोम शहरी गेल्यावर त्याला पोपचें निंद्य व विलासी वर्तन प्रत्यक्ष पाहतां आलें. परत आल्यावर त्यानें आगस्टन पंथाबद्दलहि पुष्कळ विचार केला; तेव्हां त्याला आढळून आलें कीं, केवळ बाह्य बाबीं. तच सुधारणा केल्यानें आपल्या आत्म्याची सुधारणा झाली असें होत