पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण संबंधानें करण्यांत आलेल्या कायद्यांस अग्रस्थान दिलें पाहिजे. परदेशां- तून येणाऱ्या धान्यावर जबर जकात ठेवून देशांत उत्पन्न होणाऱ्या धान्याचें संरक्षण करण्यासंबंधाचे सर्व कायदे १८४४ मध्ये रद्द करण्यांत आले. धान्यासंबंधीं पूर्वी अस्तित्वांत असलेल्या काययामुळे गरीब वर्गाचें बरेंच नुकसान होत असून श्रीमंत वर्गाचा मात्र फायदा होत होता. परंतु ते सर्व कायदे आतां रद्द करून टाकण्यांत आल्यानें गरीब लोकांस स्वस्त दरानें मुबलक धान्य मिळू लागलें. रिचर्ड कॉबडेन नांवाच्या एका गृहस्थाच्या प्रयत्नानेंच हे धान्यासंबंधी कायदे रद्द करण्यांत येऊन हलके हलके संरक्षित व्यापारपद्धतीचा त्याग खरून खुल्या व्यापाराचें तत्त्व इंग्लंडनें अंमलांत आणलें. व या तत्त्वाचा अंगीकार केल्यापासून इंग्लंडची व्यापारविषयक उत्तरोत्तर भरभराट होत गेली. अशाप्रकारें आपल्या अंतस्थ बाबीसंबंधानें महत्त्वाच्या सुधारणा करून १९ व्या शतकामध्यें इंग्लंडने आपली भरभराट करून घेतली, परंतु एका प्रश्नासंबंधीं मात्र प्रमुख ब्रिटिश मुत्सद्यांमध्ये मतभेद असल्यामुळे तो प्रश्न आतांपर्यंत तसाच धुमसत राहिला. हा प्रश्न म्हणजे आयर्लंड- संबंधाच होय. ब्रिटिश मुत्सयांनी आतांपर्यंत आयर्लंडच्या धार्मिक बाबी - कडेच लक्ष देऊन त्यांच्या राजकीय बाबींच्या सूचनांकडे दुर्लक्षच केलें होतें. सतराव्या शतकामध्यें आयर्लंडचें राज्य इंग्लंडला जोडण्यांत आल्यापासून तेथील बहुतेक सर्व जमिनी इंग्लिश लोकांनीं आपल्या ताब्यांत घेतल्या होत्या. आयर्लंडमधील जमिनी आयरिश लोकांच्या मालकीच्या नसल्यामुळे, मोठमोठ्या इंग्लिश लॉर्डींच्या जमिनीवरच काबाडकष्ट करून त्यांना आपलें पोट भरावें लागे. अशारीतीनें कांहीं वर्षे गेल्यावर १८०१ सालीं आयर्लंडचें पार्लमेंट आयर्लंडसंबंधी प्रश्न. इंग्लंडच्या पार्लमेंटला जोडण्यांत येऊन आयरिश लोकांना स्वराज्याचे थोडेफार हक्क देण्यांत आले. परंतु असल्या तुटपुंज्या हक्कांनीं आयरिश लोकांचें समाधान न होतां