पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० J गेल्या शतकांतील इंग्लंड व रशिया. ३१५ अधिक हक्क मिळविण्याची त्यांची इच्छा वाढत गेली. इंग्लंडच्या कॉमन्स- सभेमध्यें असलेल्या आयरिश पक्षास मुख्यत्वेंकरून दोन गोष्टी साध्य करून घ्यावयाचा होत्या; व त्या गोष्टी म्हणजे 'इंग्लिश लॉर्डींच्या शेतां- वर काबाडकष्ट करणाऱ्या आयरिश शेतकऱ्यांस त्या जमिनी मिळवून देणें, व आयर्लंडचें एक स्वतंत्र पार्लमेंट स्थापन करून त्या पार्लमेंटतर्फे आयर्लंडचा राज्यकारभार चालविणें,' याच होत ! प्रख्यात मुत्सद्दी ग्लॅड- स्टन यांच्या नेतृत्वाखालीं असलेल्या लिबरल पक्षानें आयर्लंडच्या न्याय्य मागणीकडे लक्ष देऊन ब्रिटिश पार्लमेंटकडून आयर्लंडच्या जमिनीसंबं- "धाचे कांहीं कायदे पास करून घेतले; तरी आयर्लंडला ब्रिटिश साम्राज्या- -न्तर्गत स्वराज्याचे पूर्ण हक्क न मिळाल्यामुळे आयरिश लोकांचें मुळींच समाधान झालें नाहीं. यानंतर आयर्लंडला ' होमरूल ' किंवा स्वराज्य देण्याचा ठराव ग्लॅडस्टन यानें पुढे आणला होता, तरी पार्लमेंटसमेंत या सूचनेविरुद्ध मताधिक्य असल्यामुळे तो फेटाळून लावण्यांत आला ! अशा प्रकारें आयर्लंडला ' होमरूल ' देण्याबद्दल ब्रिटिश पार्लमेंटने आपली कधींच मान्यता दर्शविली नव्हती ! सध्यां युरोपमध्यें भडकलेल्या महा- युद्धाच्या वेळीं आयरिश लोकांनीं आपणास कायावाचामनेंकरून मदत करावी म्हणून आयर्लंडला ' होमरूल' देण्याचें ब्रिटिश मुत्यांनी आश्वासन दिलें आहे ! या आश्वासनाप्रमाणें सांप्रतच्या युद्धसमाप्तीनंतर आयर्लंडला पूर्ण स्वराज्य मिळून आयर्लंडची अंतर्व्यवस्था पाहण्यासाठीं डब्लिन येथें एक आयरिश पार्लमेंट निर्माण होईल अशी आशा बाळग- यास हरकत नाहीं ! एकोणिसाव्या शतकांत इंग्लंडच्या भरभराटीकडे लक्ष देतांना इंग्लंडनें जगाच्या पांचही खंडांत स्थापन केलेल्या वसाहतींकडे दुर्लक्ष करून चालावयाचें नाहीं. कॅनेडा, आस्ट्रिलिया, न्यूझीलंड, साउथ आफ्रिका वगैरे ठिकाणीं ब्रिटिश लोकांच्या मोठमोठ्या वसाहती असून आशियाखंडांतील ३२ कोटी लोकवस्तीचा विस्तृत हिंदुस्थान देश इंग्लंड-