पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३१२ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण करण्यांत येऊन सर्व आयरिश रोमन कॅथलीक पंथाच्या लोकांना आपला धर्मपंथ न सोडतां कोणत्याही सरकारी हुयाच्या जागा खुल्या करण्यांत आल्या. १८२८ व १८२९ सालीं झालेल्या धार्मिक सुधारणेनंतर राजकीय बाबतींतही सुधारणा करण्याच्या सूचना पार्लमेंटसभेपुढें वारंवार येऊं लागल्या; व १८३० मध्यें पार्लमेंटची नवीन निवडणूक होऊन जेव्हां ' विग ' पक्षाकडे ब्रिटिश साम्राज्याची सर्व सूत्रे गेली तेव्हां या पक्षाच्या उदार, धोरणी, प्रागतिक प्रधानमंडळास राजकीय बाबतींत सुधा- रणा करणें अत्यावश्यक आहेसें वाटून, पहिल्याप्रथम पार्लमेंटमधील सभासदांच्या निवडणुकीसंबंधाच्या प्रश्नाचा विचार करण्याचें प्रधान- मंडळाने ठरविलें. अठराव्या शतकांतील पार्लमेंटसभेसाठी कोणत्या पद्धतीनें कोणकोणत्या ठिकाणाहून कसकसे सभासद निवडण्यांत यावे याबद्दल त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणें व्यवस्था ठरविण्यांत न आल्यामुळे इंग्लंडचें पार्लमेंट बहुजनसमाजाकडून निवडण्यांत येत नसून तें कांहीं थोड्या मूठभर लोकांकडूनच निवडण्यांत येत होतें असें म्हटल्यास त्यांत मुळींच अतिशयोक्ति नाहीं ! पार्लमेंटसभेमध्यें कोणकोणत्या ठिकाणाहून कसकसे प्रतिनिधि यावेत याबद्दलची घटना तीन शतकांपूर्वी ठरविण्यांत आली असून, त्यांमध्यें हल्लींच्या परिस्थितीस अनुसरून कांहींच फेरबदल करण्यांत आला नव्हता. गेल्या तीन शतकांमध्यें इंग्लिश समाजांत केवढा तरी बदल होऊन औद्योगिक व व्यापारविषयक क्रांति घडून आलेली होती ! पूर्वी भरभराटीस असलेली शहरें सांप्रत ओसाड पड जेथें लहान लहान खेडीं होतीं त्या ठिकाणीं औद्योगिक व व्यापारविषयक