पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० वें. J गेल्या शतकांतील इंग्लंड व रशिया. ३११ त्याही हुद्याच्या जागा मिळत नसत. तेव्हां इंग्लंडच्या एपिस्कोपेलियन धर्मपंथाव्यतिरिक्त असलेल्या धर्मपंथाच्या अनुयायांवर असलेला हा अन्याय दूर करण्यासाठी १८२८ सालीं पार्लमेंटचें मन वळविण्यांत येऊन 'टेस्ट- अॅक्ट' रद्द करण्यांत आला; व त्यामुळे मेथॉडिस्ट, बॅप्टिस्ट वगैरे निर- निराळ्या धर्मपंथांच्या अनुयायांस पूर्णपणे ब्रिटिश नागरिकत्वाचे हक्क मिळाले ! परंतु वरील सुधारणांमुळें रोमन कॅथलीक धर्माच्या अनुयायांस मात्र टेस्ट अॅक्ट रद्द झाला तरी पूर्णपणें ब्रिटिश नागरिकाचे हक्क मिळवितां येईनात ! कारण सरकारी कोणत्याही हुद्याची जागा पतकरतांना प्रत्येक माणसास पोपची सत्ता आपणास मान्य नसल्याची शपथ घ्यावी लागे; व अशा प्रकारची शपथ घेणें म्हणजे आपला रोमन कॅथलीक पंथच सोडण्यासारखें या पंथाच्या अनुयायांस होऊन जाई. त्यावेळचें प्रॉटे- स्टंटपंथीय ब्रिटिश पार्लमेंट, रोमन कॅथलीक पंथाच्या अनुयायांस ब्रिटिश नागरिकत्वाचे हक्क देण्यास उद्युक्त झालें नसतें, परंतु आयर्लंडमधील डानेि- अल ओकोनेल या पुढाऱ्यानें रोमन कॅथलीक लोकांच्या वतीनें आयरिश रोमन कॅथलीक लोकांस पूर्णपणें ब्रिटिश नागरिकत्वाचे हक्क मिळवून देण्याबद्दल जोराची चळवळ सुरू केल्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटला रोमन कॅथलीक धर्माच्या लोकांस आपला धर्मपंथ न सोडतांना देखील सरकारी हुयाची जागा मिळवितां यावी म्हणून सवड ठेवण्यांत आली. पहिल्या- प्रथम रोमन कॅथलीक लोकांच्या या चळवळीकंडे ब्रिटिश टोरी प्रधान- मंडळानें दुर्लक्ष केलें होतें, परंतु जेव्हां ड्यूक ऑफ वेलिंगटनला आढळून आलें कीं, आपल्या पुढाऱ्यास पाठबळ देण्यासाठी सर्व आयरिश रोमन कॅथलीक जनता तयार असून वेळ पडल्यास राज्यक्रांतिही घडवून आण- ण्यास ही जनता मागें पुढें पहाणार नाहीं, तेव्हां आयरिश लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊन १८२९ सालीं ' आयरिश रिलीफ बिल पास