पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण २० वें. गेल्या शतकांतील इंग्लंड व रशिया. नेपोलियनची सत्ता उलथून पाडण्याचे काम मोठ्या चिकाटीनें 'वं दृढनिश्चयानें ग्रेटब्रिटनप्रमाणें दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रास आपले सर्व सामर्थ्य खर्च करून लढावें लागलें नाहीं ! तेव्हां अर्थातच १७९३ पासून १८१५ पर्यंत नेपोलियनशीं चाललेल्या युद्धाचा शेवट झाल्यावर फ्रेंच राज्यक्रान्तीपासून उत्पन्न झालेल्या कल्पनांचा व विचारां- चा बीमोड करण्याकडे त्यावेळचें ब्रिटिश प्रधान मंडळ उयुक्त व्हावें यांत कांहींच नवल नव्हतें ! या वेळीं लॉर्ड कॅसलरे, ड्यूक ऑफ वेलिंगटन वगैरे प्रतिगामी मुत्सद्यांच्या नेतृत्वाखालीं असलेल्या टोरीपक्षाच्या हातीं राज्यकार- भाराचीं सर्व सूत्रे असून, राजकीय, धार्मिक व व्यापारविषयक सुधारणा करण्यासंबंधीं येणाऱ्या सर्व सूचना फेंटाळून लावण्याचा या पक्षानें उप- क्रम सुरू केला. युरोपमधील ऑस्ट्रिया, प्रशिया व रशिया या राष्ट्रांकडून लावण्यांत आलेल्या प्रतिगामी धोरणाविरुद्ध चळवळी होऊन त्यांनी केलेली व्यवस्था हाणून पाडण्याचा ज्याप्रमाणें युरोपियन जनतेनें प्रयत्न केला, तशाच प्रकारचा प्रयत्न इंग्लंडमध्यें देखील होऊन, राजकीय, धार्मिक व व्यापार- विषयक सुधारणा करण्याकडे प्रधानमंडळाचें लक्ष वेधण्यासाठीं ब्रिटिश जनताही खटपट करील असें स्पष्ट दिसूं लागलें. ब्रिटिश जनतेकडून सुचविण्यांत आलेल्या सर्व सुधारणांपैकीं धार्मिक बाबतींतच सुधारणा करणें इष्ट आहे असें पहिल्याप्रथम प्रतिगामी धोरणाच्या प्रधानमंडळास वाटूं लागलें. १६८९ मध्ये पास झालेल्या टॉलरे- शन ' कायद्यामुळे लोकांस कोणत्याही धर्माप्रमाणें वागण्याची मुभा मिळाली होती; परंतु त्यावेळी 'टेस्ट अॅक्ट' रद्द न झाल्यामुळे त्यांना सरकारांत कोण- ,