पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ वें. ] संयुक्त जर्मनी. ३०९. आस्ट्रिया-हंगेरीचें साम्राज्य. अंतःस्थ बाबीकडे त्यास लक्ष पुरावावयाचें असल्यामुळे फ्रँको-जर्मन युद्धाच्या 'वेळीं तटस्थ राहिल्यावांचून त्यास गत्यं- तरच नव्हतें ! १८६६ सालीं प्रशियाकडून जर्मन राजकारणांतून ऑस्ट्रियाची हकालपट्टी झाल्यावर आपलें विस्खळित असलेलें साम्राज्य चिरस्थायी करण्यासाठी, आपल्या साम्राज्याच्या अंतस्थ रचनेंत महत्त्वाच्या सुधारणा करणें इष्ट आहे असें फॅन्सीस जोसेफला बाटूं लागलें. लोकनियंत्रित राज्यपद्धतीचा अंगीकार केल्याखेरीज आपलें अठरा धान्यांचे कडबोळें असलेलें साम्राज्य टिकावयाचें नाहीं हें त्यास कळून चुकलें. आस्ट्रियन साम्राज्यांत मोडणाऱ्या हंगेरि लोकांना विशिष्ट राजकीय हक्क देणें त्यास अत्यावश्यक वाटू लागून ही महत्त्वाची सुधारणा घडवून आणण्यासाठीं त्यानें आपल्या साम्राज्याचे आस्ट्रिया व हंगेरी असे दोन विभाग करून, परराष्ट्रीय राजकारण व लष्करी व आरमारी व्यवस्था या बाबींखेरीज इतर बाबींमध्यें हीं दोन्हीं राष्ट्रें पृथक् केलीं ! अशा रीतीनें सांप्रत आस्ट्रिया व हंगेरी या दोन्ही देशांतील कायदे कौन्सिलें व राज्यपद्धति निरनिराळी असून, आस्ट्रिया- हंगेरीच्या सम्राटास व्हिएन्ना शहरीं आस्ट्रियाचा बादशहा व बुडापेस्ट शहरीं हंगेरीचा राजा असे दोन किताब देण्यांत येतात. १८६७ सालीं आस्ट्रिया-हंगेरीच्या साम्राज्यांत अशा महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्यावर आजपर्यंत हें साम्राज्य सर्व लोकांच्या कल्पनेबाहेर व्यवस्थित रीतीनें टिकलें आहे ! परंतु या साम्राज्यांत स्लाव्ह लोकांची बरीच संख्या असून हंगेरीयन लोकांप्रमाणेंच आपणासही साम्राज्यांतर्गत स्वराज्य द्यावें असें यांचें म्हणणें आहे ! आजपर्यंत स्लाव्ह लोकांच्या या मागणी- कडे आस्ट्रियानें दुर्लक्ष केलें होतें, परंतु सांप्रतच्या महायुद्धानंतर या लोकांस स्वराज्याचे हक्क द्यावे लागतात कीं काय हेंच पाहावयाचें आहे !