पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण वाटूं लागलें. गॅबेटानें फ्रान्समध्ये प्रजासत्ताक राज्य स्थापन केल्याचे जाहीर केल्यानंतर फ्रान्सच्या राज्यव्यवस्थेची घडी फ्रान्समधील चमत्कारिक परिस्थिति. नीट बसण्यापूर्वी, पॅरिसमधील कित्येक चळवळ्या माथेफिरू लोकांस पॅरीसमध्यें पुनः बेबंदशाहीच असर्णे इष्ट वाटून, त्यांनीं फ्रान्समध्यें नुकतेंच स्थापन झालेलें प्रजासत्ताक राज्य मोडून टाकलें व पॅरीस शहर दोन महिनेपर्यंत ( एप्रिल ते मे - १८७१ ) आपल्या ताब्यांत घेतलें. अशा प्रकारें फ्रान्समधील परिस्थिति फारच चमत्कारिक झाली असतांना टायर नांवाच्या एका कर्तृत्ववान् देशभक्तास फ्रान्सच्या प्रजासत्ताक राज्याचे अध्यक्षपद देण्यांत आलें ! टायर ह्यानें पॅरीस शहरांतील - बेबंदशाही मोडून टाकण्यासाठीं मार्शल मॅकमोहनच्या हाताखालीं - बरेंच सैन्य पाठविलें. हें सैन्य पॅरीस शहरीं दाखल होतांच पॅरीस शहराच्या भर रस्त्यावर चळवळ्या लोकांची व मॅकमोहनच्या हाताखालील फ्रेंच सैन्याची निकराची लढाई होऊन त्यांत चळवळ्या माथेफिरू लोकांचा पूर्ण मोड झाला. अशा रीतीनें फ्रान्समध्ये सुव्यवस्थित लोकसत्ताक राज्य स्थापण्यांत येतें. १८७१ जून. पॅरीसमधील दंगा मोडल्यानंतर, चळवळ्या लोकांनीं गेल्या अंदाधुंदीच्या काळांत पॅरीस शहराची केलेली राखरांगोळी दुरुस्त करून पुनः तेथें पूर्ववत् लोकसत्ताक राज्याची प्राणप्रतिष्ठा करण्यांत आली. टायर्स व मॅकमोहन यांच्या प्रयत्नानें फ्रान्समध्यें स्थापन झालेलें हैं लोक- सत्ताक राज्य भक्कम पायावर उभारलें गेलें असून त्याची उत्तरोत्तर भर- -भराट होत गेली ! १८७० साली फ्रँको-जर्मन युद्धाच्या वेळीं युरोपियन राष्ट्रें तटस्थच होतीं ! १८६६ सालीं प्रशियाकडून आपल्या झालेल्या पराभवाचा सूड घेण्यासाठीं या युद्धांत आपण भाग घ्यावा असें ऑस्ट्रियाचा बादशहा फॅन्सीस जोसेफ यास एकवार वाटले; परंतु आपल्या साम्राज्यांतील