पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ वें. ] संयुक्त जर्मनी. ३०७ त्वाच्या सुधारणा घडून आल्या ! उत्तर व दक्षिण जर्मन संस्थानांच्या संघटित प्रयत्नानें हा विजय संपादन करण्यांत संयुक्त जर्मनीची स्थापना - १८७१ आल्यामुळे उत्तर व दक्षिण जर्मन संस्थानांचें एक संघटित राष्ट्र निर्माण करण्याची इच्छा सर्वासच बाहूं लागून जर्मन सैन्य फ्रान्समध्यें विजय संपादन करीत असतांनाच २८ जानेवारी १८७१ रोजी व्हर्सेल्स शहारामध्येंच प्रशियाचा राजा. इल्यम यास ' जर्मन बादशहा ' असा किताब देण्यांत आला. यानंतर संयुक्त जर्मनीच्या राज्यघटनेचा एक मसुदा तयार कर- ण्यांत आला. या घटनेप्रमाणें जर्मनीचे एक संयुक्त राष्ट्र स्थापन करण्यांत आलें. संयुक्त जर्मनीसाठीं कायदे करणारें एक मंडळ असून त्यांत बुंडे- साथ व राइसटाँग असे दोन भाग असत. जर्मनींतील एकंदर पंचवीस संस्थानांनी बुडेसाथ या वरच्या सभेसाठीं प्रतिनिधी पाठवावयाचे असून राइसॉंग सभेसाठीं जर्मन जनतेनें निवडलेले प्रतिनिधी येत असत. बुंडे- सूराथ व राइसटाँग या दोन सभांमार्फत संयुक्त जर्मन राष्ट्रासाठी कायदे. करण्यांत येत असून प्रशियाचा राजा हा जर्मन बादशहा या नात्यानें सर्व कायद्यांची अंमलबजावणी करी ! जर्मनींतील एकंदर संस्थानांपैकीं प्रशियाचे संस्थान सर्वापेक्षां फारच मोठें व बलाढ्य असून, त्या संस्थानाच्या राजासच जर्मन बादशहा होण्याचा मान मिळत असल्यामुळे जर्मनीमधील सर्व धोरण प्रशियाच्या धोरणाप्रमाणेच ठरविण्यांत येई ! याखेरीज प्रशियाच्या राजास आपला मुख्य प्रधान ( चान्सेलर) नेमण्याचा व त्यास वाटेल त्यावेळेस आपल्या जागेवरून काढण्याचा अधिकार असून जर्मनी- तील ' कायदे करणाऱ्या मंडळास ' प्रधानमंडळांतील मंत्री कोणत्याही तऱ्हेनें जबाबदार नसल्यानें जर्मनींतील मंत्रिमंडाळाची सत्ता लोकनियंत्रित नसून हें मंत्रिमंडळ बादशहाच्याच हुकमानें राज्यकारभार करी ! जर्मनीशी तह करण्यांत आल्यावर फ्रान्सची अंतस्थ स्थिति फार चमत्कारिक होऊन फ्रान्सवर पुनः अनर्थपरंपरा कोसळते कीं काय असें