पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण भाषेतील पुस्तकांत ख्रिस्ती धर्मासंबंधीं काय काय आधार सांपडतात, यांचा विचार करण्यामध्यें निमग्न होते. अशा रीतीनें उत्तरेकडील राष्ट्रांमधील विद्वान् व विचारवंत लोक 'नैतिक व धार्मिक सुधारणेसंबंधीं विचार करीत असतांना जर्मनीमधील. "रॉइचलिन, उलरिच, हूटन व इरासमस वगैरे विद्वानांनीं यामध्यें पुढाकार घेतलेला होता. या लोकांच्या प्रयत्नानेंच पुढें धर्मसुधारणेसंबंधी होणाऱ्या चळवळीचें बीज पेरलें गेलें असें म्हणण्यास हरकत नाहीं. जॉन रॉइचलिन हा विद्वान् असून त्यानें लिहिलेल्या अनेक ग्रंथांप हिब्रू भाषेचें व्याकरण हा प्रसिद्ध ग्रंथ होता. परंतु. एवढ्यानेंच तो ख्रिस्ती धर्माधिकाऱ्यांच्या रोषास पात्र होऊन त्याच्यावर धर्मवेड्या धर्माधिकाऱ्यांनी टीका- रॉइचलिन १४५५-१५२२ प्रहार केले. परंतु या टीकाप्रहारांस न जुमानतां त्यास पुष्कळ विद्वान् लोकांचें पाठबळ मिळालें; व हूटन नांवाच्या विद्वाना- तर 'एका अप्रसिद्ध माणसाची पत्रे' या नांवाचा ग्रंथ लिहिला व. चर्चच्या जुलमी व अन्यायी कृत्यांवर खरमरीत टीका करून चर्चच्या सत्तेविरुद्ध लोकमत तयार करण्याचा प्रयत्न केला. हूटनप्रमाणेंच डेसिडेरियस इराझमस ( १४६७ - १५३६ ) नांवाच्या गृहस्थानें रोमन चर्चच्या अव्यवस्थित, जुलमी व निंद्य वर्तनावर खरमरीत टीका केली. इराझमस हा एक मोठा वाङ्मयभक्त होता. त्यानें ग्रीक व लॅटिन भाषेंमध्ये ' न्यू टेस्टमेंटची ' एकः आवृत्ति प्रसिद्ध केली असल्यानें बायबलवर अर्वा -- 2 चीन काळी होणाऱ्या भाष्यांमध्यें त्याच्या भाष्यास इराझमस १४६७-१५३६० 'अग्रस्थान दिलें पाहिजे. याखेरीज रोमन चर्चचें किळसवाणें स्वरूप: सर्वोच्या निदर्शनास आणण्यासाठीं त्यानें १५११ मध्यें ' मूर्खाचरणाची स्तुति " या नांवाचा एक ग्रंथ लिहिला. ,