पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०६ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण ता १ सप्टेंबर रोजीं सेडननजीक मॅकमेहनच्या सैन्याची पुनः जर्मन- सैन्याशीं गांठ पडली. या वेळीं अवाढव्य जर्मन सैन्याशीं टक्कर देणें अगदींच अशक्य झाल्यामुळे मॅकमोहनला आपल्या सैन्यासहवर्तमान शत्रूंस शरण जाणे भाग पडलें. या वेळीं बादशहा नेपोलियन मॅकमोहनबरोबर असल्यामुळे त्यास कैद करून व्हाईन नदीच्या उत्तरेकडे मोठ्या बंदोबस्तानें पाठविण्यांत आलें; व विजयी जर्मन सैन्य सप्टेंबर महिन्याच्या शेवटीं पॅरीस शहरानजिक येऊन दाखल झालें. मध्यंतरीं पॅरीस शहरों बराच गोंधळ माजून राहिला होता. सेडन- नजीक फ्रेंच सैन्य व बादशहा नेपोलियन शत्रूंस शरण गेल्याची बातमी ऐकतांच पॅरीसमधील जनतेनें नेपोलियनचा धिक्कार केला व फ्रान्समधील राजसत्ता उलथून पाडून फ्रान्समध्यें लोकसत्ताक राज्य स्थापन झाल्याचे जाहीर केलें ( ४ सप्टेंबर ). या वेळीं गँबेटा नांवाच्या पुढाऱ्याने इतर पुढाऱ्यांच्या मदतीने शत्रूंशी युद्ध चालविण्यासाठीं ' राष्ट्रसंरक्षक मंडळ स्थापन केलें. 9 गॅबेटानें आपल्या हाताखालील फ्रेंच सैन्याच्या मदतीने शत्रूपासून पॅरीस शहराचें संरक्षण करण्याचा मोठ्या शौर्यानें प्रयत्न केला; परंतु प्रशि- याच्या कवाईत शिकवून तयार असलेल्या सैन्यापुढे गँबेटाच्या अनुभ सैन्याचा टिकाव लागला नाहीं. २८ जानेवारी १८७१ रोजी मेटझचा किल्ला पडल्याची हकीकत समजतांच फ्रेंच सैन्याचा धीर खचला, व पॅरीस शहराची अन्नसामुग्रीवांचून उपासमार होत असल्यामुळे शत्रूंस शरण गेल्यावांचून गत्यंतरच राहिलें नाहीं. १८७१ च्या फेब्रुवारीच्या प्रारंभी फ्रेंच सैन्य शत्रूंस शरण गेल्यानंतर जर्मनीनें फ्रान्सकडून अलसाक व लारेन हे दोन्ही प्रांत व वीस कोटी पौंड खंडणी मिळविली. फान्सप्रमाणें या युद्धानें जर्मनीच्या अंतस्थ व्यवस्थेमध्येही मह-