पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ वें. ] संयुक्त जर्मनी. ३०५ पाहून लिओपोल्डनें स्पेनचें राज्यपद नाकारलें; परंतु नेपोलियनचें एव- ढ्यानेंच समाधान न होतां पुनः कधींही पद स्वीकारतां येणार नाहीं' अशाबद्दलचें वुइल्यम यानें द्यावें अशी मागणी केली. 'लिओपोल्डकडून स्पेनचें राज्य- अभिवचन प्रशियाचा राजा प्रशियाचा राजा वुइल्यम यानें नेपोलियनच्या या अरेरावी मागणीचा निषेध करितांच नेपोलियननें फ्रेंच पार्लमेंटच्या पूर्ण संमतीनें १९ जुलै १८७० रोजी प्रशियाशीं युद्ध जाहीर केलें ! दक्षिणेकडील जर्मन संस्थानांना प्रशियाच्या वर्चस्वाबद्दल वैमनस्य वाटत असल्यामुळें तीं संस्थानें या युद्धामध्यें आपल्या बाजूला मिळतील असें नेपोलियनला वाटत होतें; परंतु त्या संस्थानांनी या वेळीं प्रशियाला दगा न देतां आपापली सैन्यें प्रशियाच्या वतीनें लढण्यासाठीं रवाना केलीं. अशा रीतीनें १८७० साली फ्रान्सशीं लढण्यासाठीं एकटेंच प्रशियाचें संस्थान उद्युक्त झालें नसून आज कितीतरी शतकांनीं सर्व जर्मन राष्ट्रच आपल्यांतील कलह विसरून उद्युक्त झालें होतें ! फ्रँको- जर्मन युद्ध -१८७०. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभींच जर्मन फौजा तयार होऊन त्यांनीं फ्रान्सवर एकदम स्वारी केली. ता. ६ ऑगस्ट रोजी प्रशियाचा राजपुत्र फ्रेडरीक याच्या हाताखालील जर्मन सैन्याची, मार्शल मॅकमोहन याच्या हाताखालील फ्रेंच सैन्याशीं बर्थ येथें गांठ पडून फ्रेंच सैन्याचा पुरा मोड झाला, व आल्सास प्रांत जर्मनीच्या ताब्यांत आला. फ्रेंच सैन्याची दुसरी तुकडी लॉरेन प्रांतांत असून, मेटाच्या किल्ल्याचा आश्रय धरून होती. जर्मन सेनापति मोल्टके याच्या मनांतून फ्रेंच सैन्य तेथेंच कोंडून धरावयाचें असल्यामुळें त्यानें १८ ऑगस्ट रोजी ग्रॅव्हेलोटी येथें फ्रेंच सैन्याचा पराभव करून मेटझ् किल्लथास गराडा दिला ! मेटझच्या वेढ्यासाठीं अर्धे सैन्य ठेवून तो बाकीच्या अर्ध्या सैन्यानिशीं मॅकमोहनचा पाठलाग करण्यासाठीं पुढे जाण्यासाठी निघाला.