पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०४ युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण जर्मन संस्थानांकडून धिक्कार करण्यांत आला ! त्यानंतर लागलीच १८६७ साली लंडन शहरी सर्व राष्ट्रांची एक परिषद भरविण्यांत येऊन ' लग्झेम्बर्ग ' हा प्रांत स्वतंत्र असल्याचें ठरविण्यांत आलें. इकडे नेपोलियनची स्थिति मात्र चमत्कारिक झाली ! लग्झेम्बर्ग- सारख्या जर्मनीमध्ये मोडल्या जाणान्या जर्मन संस्थानाबद्दल नेपोलि- यननं मागणी करून तें संस्थान आपल्या राज्यास जोडण्याची नेपोलियनबद्दल तिट- इच्छा प्रदर्शित केली असल्यानें सर्व जर्मन जनतेस कारा वाटूं लागला; त्याचप्रमाणें 'आस्ट्रो-प्रशिया' युद्धाच्या वेळीं नेपो- लियननें तटस्थ राहून -हाइन नदीच्या पलीकडील मुलूख काबीज करण्या- चा संधि व्यर्थ गमावली म्हणून फ्रेंच जनताही नेपोलियनला दोष देऊं लागली ! अशाप्रकारें आस्ट्रो-प्रशियन युद्धांत आस्ट्रियाच्या वतीनें प्रशिया- शीं युद्ध करण्याची संधि आपण व्यर्थ गमावली म्हणूनच आपणावर चोहोंकडून टीकाप्रहार होत आहेत हें लक्षांत येतांच पुनः संधि सांपड- ल्यास प्रशियाशीं युद्ध करून आपल्या नांवावरचा कलंक धुवून टाकण्याचा नेपोलियननें निश्चय केला ! नेपोलियनच्या मनांत कोणते विचार चालले असतील, व संधि सांपडल्यास तो आपणावर सूडही घेण्यास मागें पुढें पाहणार नाहीं हें प्रशियाचा मुत्सद्दी प्रिन्स बिस्मार्क यासही कळून चुकलें ! तेव्हां अशाप्रकारें दोन्हीं राष्ट्रांमध्यें एकमेकांविषयीं कलुषित मत असल्या- मुळे एखादें कारण सांपडतांच हीं दोन राष्ट्र एकमेकांवर शस्त्र उपसण्यास तत्पर होतील असें स्पष्ट दिसूं लागलें ! १८७० मध्ये स्पेनचा राजा मरण पावून स्पेनच्या गादीस कोणीच वारस नसल्यानें स्पॅनिश पार्लमेंटनें होहेनझोलार्न घराण्यांतील 'लिओपोल्ड'. यास राज्यपद देऊं केलें. राजपुत्र लिओपोल्ड हॉ को - जर्मन युद्धास निमित्तकारण. प्रशियाचा राजा वुइल्यम याचा नातलग असल्या- मुळें स्पेनच्या गादीवर त्याच्या निवडणुकीसंबंधानें पॅरसि शहरीं बरीच खळबळ उडून गेली ! आपल्या विरुद्ध ही खळबळ