पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ वें. ] संयुक्त जर्मनी. ३०१ कवाईत शिकवून तयार ठेवलेल्या सैन्याची खरी किंमत कळून आली. प्रशियाचें सैन्य आपल्या शत्रूशीं लढण्यासाठीं तत्काळ तयार झालें. प्रशियन सेनापति मोल्टके यानें आपल्या सैन्याची नीट रचना करून बोहे- मिया प्रांतांतील सडोवा शहरानजीक आस्ट्रियन प्रशिया व आस्ट्रिया यांच्यामधील निकराचें युद्ध-सॅडोवाची लढाई १५६६. सैन्य कोंडून धरून ३ जुलै रोजीं आस्ट्रियन सैन्या- चा पुरा फडशा पाडला. इटलीमध्यें आस्ट्रियन सैन्यानें इटालियन सैन्याविरुद्ध कस्टोझाच्या लढाईत जरी जय मिळविला होता, तरी आस्ट्रि- यन सैन्याचा मुख्य भाग प्रशियाच्या ताब्यांत सांपडल्यामुळे इटलीमधील जयाचें कांहींच महत्त्व नव्हतें ! सॅडोवाच्या लढाईत पूर्ण पराभव झाल्या- मुळे १८६६ च्या ऑगस्टमध्यें प्रेग शहरी तह केल्यावांचून आस्ट्रियाला गत्यंतर नव्हतें. प्रेगच्या तहानें जर्मनीच्या राजकारणांतून आपला संबंध काढून घेण्याचें आस्ट्रियानें कबूल करून प्रशियानें केलेल्या नवीन घटनेस आपण मान्यता दर्शवूं असें आस्ट्रियानें कबूल केलें. याखेरी जर्मनीच्या राज- इटलीमधील व्हेनिस हा प्रांत संयुक्त इटलीच्या कारणांतून आस्ट्रियाची स्वाधीन करावा लागून, श्लेझविंग व होलस्टेन हे दोन्ही प्रांत बिनशर्त प्रशियाच्या ताब्यांत देण्याचें आस्ट्रियाला मान्य करावें लागलें. हकालपट्टी - १८६६. अशा रीतीनें जर्मनींतील आस्ट्रियाचें महत्त्व कमी केल्यावर प्रिन्स बिस्मार्कनें आस्ट्रियाच्या इतर जर्मन संस्थानांबरोबर तह केला. बव्हेरिया वर्टेम्बर्ग व इतर दक्षिण जर्मनींतील संस्थानें यांच्याकडून खंडणी वसूल करून घेतली, परंतु प्रशियाच्या विरुद्ध असलेल्या हॅनोव्हर, नॅस वगैरे कांहीं संस्थानांचें स्वातंत्र्य हिरावून घेण्यांत येऊन तीं प्रशियाच्या राज्यास जोडण्यांत आलीं !