पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०० युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण हे दोन प्रांत हस्तगत झाल्यावर या प्रांतांची वांटणी कशी करावयाची हा बिकट प्रश्न अर्थातच पुढें आला ! या दोन प्रांतांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन . या दोन प्रांतांचें एक लहानसें संस्थान बनविण्याचा विचार करणें आस्ट्रिया व प्रशिया या राष्ट्रांस इष्ट वाटलें नाहीं, तर हे दोन्ही प्रांत आपणास मिळावे असें प्रशियाचा मुख्य प्रधान प्रिन्स बिस्मार्क यास वाटूं लागलें. जर्मनीमध्यें आपलें वर्चस्व स्थापन करावें अशी आस्ट्रिया व प्रशिया या दोन राष्ट्रांमध्ये बरेच दिवसांपासूनची चुरस होती; व या दोन प्रांतांच्या वांटणीत जर कोणाला अधिक भाग मिळाला, तर त्या संस्थानांचें जर्मनी - मध्यें वर्चस्व वाढेल अशी या दोन राष्ट्रांस भीति वाटत होती ! तेव्हां या दोन प्रांतांच्या वांटणी- संबंधानें आस्ट्रिया व प्रशिया यांमध्यें कलह उत्पन्न लेझविंग व होलस्टेन या प्रांतांची वांटणी कशी करावयाची ? झाल्यास कांहींच नवल नाहीं. इतकेंच नव्हे तर अशाप्रकारचा कलह उत्पन्न करून आस्ट्रियाचा नक्षा कमी करावा अशी प्रशियाचा प्रख्यात मुत्सद्दी प्रिन्स बिस्मार्क याची इच्छा होती ! तेव्हां हेतु साध्य करून घेण्यासाठी १८६६ च्या मार्च महिन्यांत प्रशियानें इटलीशीं तह केला; व त्यानंतर आस्ट्रियानें प्रशियाविरुद्ध जर्मनींतील लहान लहान संस्थानांबरोबर तह केला. अशाप्रकारें जर्मनीमधील हीं दोन प्रमुख संस्थानें १८६६ च्या जून महिन्याच्या सुमारास एकमेकांवर हल्ला करण्यासाठी सज्ज झाली ! जर्मनीमध्ये कोणाचें वर्चस्व असावें या- संबंधानें शंभर वर्षांपूर्वी फ्रेडरीक धी ग्रेट व मेरिया थेरेसा यांच्यापासून चालत आलेल्या चुरसीचा एकदां कायतो सोक्षमोक्ष करून घ्यावा असें दोन्ही पक्षांस वाटत होतें असें म्हणण्यास हरकत नाहीं. आतां यावेळीं प्रशियाचा राजा वुइल्यम यानें अर्वाचीन पद्धतीनें