पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०२ उत्तरेकडील जर्मन संस्थानांचा संघ, प्रिन्स विस्मार्ककडून स्थाप- ण्यांत येता. युरोपचा अर्वाचीन इतिहास. [ प्रकरण अशा रीतीनें दक्षिण जर्मनींतील संस्थानांची वाट लावल्यावर मेन नदी - च्या उत्तरेकडे असलेल्या संस्थानांचा प्रशियाच्या नेतृत्वाखालीं एक संघ स्थापन करण्यांत आला. यावेळी बिस्मार्कनें दक्षिणेकडील संस्थानांना या संघाचे घटकावयव होण्यास भाग पाडलें नाहीं. दक्षिणे- कडील संस्थानांमध्यें रोमन कॅथलीक पंथ पंच- लित असल्यामुळें, प्रशियासारख्या प्रॉटेस्टंट पंथीय संस्थानांच्या नेतृत्वाखालील संघांत सामील होण्यास दक्षिणेकडील संस्थानें कचरतील असें प्रिन्स बिस्मार्कला वाटत होतें. जर्मनीकडे नजर टाकल्यास उत्तरेकडे प्रशि- याच्या नेतृत्वाखालीं असलेला उत्तर जर्मन संस्थानांचा बलाढ्य संघ व दक्षिण जर्मनीमध्यें बव्हेरिया, वर्टेम्बर्ग, बेडन, हीस हीं चार एकमेकां- पासून अलग असलेलीं संस्थानें दिसून येतील. परंतु १८७० मध्ये फ्रँको- जर्मन युद्धाच्या वेळीं व हें युद्ध झाल्यानंतर स्थापन झालेल्या संयुक्त जर्मनी या राष्ट्राचा पाया प्रिन्स बिस्मार्कनें उत्तर जर्मन संस्थानांचा प्रशियाच्या नेतृत्वाखालीं एक बलाढ्य संघ स्थापन करण्याच्या वेळींच घातलेला होता असे म्हणावयास पाहिजे. तेव्हां १८७० मध्यें उपस्थित झालेल्या फ्रँको-जर्मन युद्धामुळें जर्मनीचें कसें एकीकरण झालें तें नीट समजण्यासाठी फ्रान्स व जर्मनी यांच्यामध्यें वितुष्ट येऊन फ्रँको-जर्मन युद्ध कसें सुरू झालें हें पहाणें जरूर आहे. फ्रान्सचा बादशहा नेपोलियन यानें १८५९ मध्यें आस्ट्रियावर मिळविलेला जय आपण पाहिलांच आहे. त्यावेळीं नेपोलियननें पूर्ण वैभव संपादन केलें असून सर्व इटालियन देशभक्तांस त्याजबद्दल आदर वाट होता; परंतु यानंतर नेपोलियननें आस्ट्रियाचा पुरा मोड करण्याचे टाकून सार्डिनियाच्या राजाची संमति घेतल्याखेरीज शत्रूशी अचानक तह केलेला पाहून तर नेपोलियनची इटलीमधील लोकप्रियता कमी होत गेली;